२४ कॅरेट गोल्ड आईसक्रीम कधी खाल्लंय का? किंमत पाहुन म्हणाल व्हिडिओ बघुनच समाधान मानतो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 07:33 PM2022-01-17T19:33:30+5:302022-01-17T19:36:53+5:30
सोन्याने सजवलेलं आईसक्रीम असतं का? तर या प्रश्नाचं उत्तर 'हो' असे आहे. कारण आता शुद्ध सोन्याचं आईसक्रीम (icecream) असलेला व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे का की सोन्याने सजवलेले आईसक्रीम(gold plated icecream) कसे लागेल? आता तुम्ही म्हणाल असा विचार आम्ही का करू? सोन्याने सजवलेलं आईसक्रीम असतं का? तर या प्रश्नाचं उत्तर 'हो' असे आहे. कारण आता शुद्ध सोन्याचं आईसक्रीम (icecream) असलेला व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एक फूड ब्लॉगर अभिनव जेसवानी याने आपल्या इंस्टाग्रामवर या सोन्याच्या आईसक्रीमचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बघता बघता हा प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या आईसक्रीमचे नाव मिनी मिडास असे ठेवण्यात आले असून हे हैदराबाद येथे ह्यूबर अँड हॉली कॅफे (Huber and Holly café ) मध्ये मिळत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गोल्ड प्लेटेड आईसक्रीम बनवताना दिसत आहे. एक चॉकलेट कोनमध्ये काही आईसक्रीम भरतो. त्यानंतर त्यावर सोन्याचे वर्ख करतो आणि त्यानंतर त्याच्यावर सजावटीसाठी चेरी सर्व्ह करतो. तसेच, त्यामध्ये गोल्डन बॉलदेखील ठेवण्यात आले आहे ज्यामध्ये गोल्डन क्रिम आहे. त्यानंतर गोल्डन गोल्ड पेपरने झाकले जाते.
अभिनव जेसवानीने हा व्हिडीओ नागपुर थिंग्स नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. आणि कॅप्शमध्ये '24 कॅरेट गोल्ड आईसक्रीम हैदराबाद येथील प्रसिद्ध 'ह्यूबर अँड हॉली कॅफे (Huber and Holly café ) येथे मिळत आहे. मी आत्तापर्यत असे आईसक्रीम कधीच चाखले नाही. तुम्हालाही आता हे आईसक्रीम चाखायला हवे.' असे अभिनवने म्हटले आहे.
या आईसक्रीमची किंमत ५०० रुपये आहे. इतकेच नव्हे तर यावर टॅक्सदेखील लागतोय सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आत्तापर्यंत ४० लाखापेक्षा अधिक युजर्सनी पाहिला आहे तर २ लाखापेक्षा जास्त युजर्सनी लाईक केले आहे.