ज्येष्ठ नागरीकांसाठी २४ तास कार सेवा!

By admin | Published: August 14, 2016 04:13 PM2016-08-14T16:13:33+5:302016-08-15T02:55:14+5:30

ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जठारपेठ परिसरातील काही ध्येयवेड्या युवकांनी 'आपलं जठारपेठ' ग्रुपच्या माध्यमातून निशुल्क २४ तास कार सेवेचा उपक्रम सुरू केला.

24 Hours Car Service for Senior Citizens! | ज्येष्ठ नागरीकांसाठी २४ तास कार सेवा!

ज्येष्ठ नागरीकांसाठी २४ तास कार सेवा!

Next
>ज्येष्ठांना आपलं जठारपेठचा आधार, ध्येयवेड्या युवकांनी सुरू केला उपक्रम
 
नितीन गव्हाळे / अकोला
वृद्ध माणसं आज घरातील अडगळ झालेली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी घरातलं फारसं कोणी तयार नसतं. मुले, मुली नोकरीनिमित्तानं बाहेरगावी गेलेली. कोणाला दवाखान्यात, बँकेत, बस्टस्टँड, रेल्वेस्टेशनवर जायचं असतं. औषधं, गोळ्या आणायच्या असतात. पण कोणाला सांगाव, कोणाला सोडून मागावं. अशी अडचण ज्येष्ठ नागरीकांना नेहमीच जाणवते. त्यांची ही गरज लक्षात घेऊन जठारपेठ परिसरातील काही ध्येयवेड्या युवकांनी आपलं जठारपेठ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरीकांसाठी निशुल्क २४ तास कार सेवेचा उपक्रम सुरू केला.
एका कवीनं, खरंच किती बरं झालं असतं...जर २४ तास कोणीतरी आपलं झालं असतं. अशा शब्दात समाजाचं दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला. या कवीच्या ओळी आपलं जठारपेठच्या कार्यकर्त्यांनी सार्थ ठरविल्यात. २४ तास ते जठारपेठ परिसरातील नागरीकांसाठी आपलं म्हणून उपलब्ध झालेत. दवाखाना, आजारपण, बसस्टँड, रेल्वेस्टेशन, बँक, कुठेतरी नातेवाईक, लग्नसमारंभासाठी ज्येष्ठ नागरीकांना जावे लागते. त्यांना पोहोचून देण्यासाठी फारसा कुणाला वेळ नसतो किंवा मदतीला धाऊन येईल. असं घरात कोणीच नसतं. सिटी बसने जावं तर तीही बंद झालेली. आॅटोरिक्षाने जावे तर अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागते आणि एवढे भाडे देण्याची ज्येष्ठांची मानसिकता नसते. अशीच काहीशी परिस्थिती आम्ही आजुबाजूला नेहमीच अनुभवत असतो. ज्येष्ठ नागरीकांची ही व्यथा जठारपेठ परिसरातील युवकांनी जाणली. त्यांनी आपलं जठारपेठ या ग्रुपची गुढीपाडव्याला सुरूवात केली. ज्येष्ठ नागरीकांच्याच समस्या नाहीतर जठारपेठ परिसरातील सफाई, दिवाबत्ती, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यासह अनेक समस्या सोडविण्यासाठी आपलं जठारपेठ हा ग्रुप सुरू करण्यात आला. परिसरातील समस्या मार्गी लावण्यासाठी आपलं जठारपेठमधील सदस्य झटतात. ज्येष्ठ नागरीकांसाठी आपलं जठारपेठ ग्रुपच्या सदस्यांनी २४ तास कारसेवा सुरू केली आहे. यासाठी दोन चारचाकी वाहन उपलब्ध केली आहेत. रात्रीबेरात्री दवाखाना, रूग्णालय, बसस्टँड, रेल्वेस्टेशनवर ज्येष्ठ नागरीकांना सोडून देण्यासाठी या ग्रुपमधील कोणताही सदस्य त्यांना कारने सोडून देतो. परत घेऊन येतो. गत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या २४ तास कार सेवेमुळे जठारपेठेतील ज्येष्ठ नागरीकांना मोठा आधार मिळाला आहे. ज्येष्ठ नागरीकांना कोठेही बाहेर जायचे असेल, कधीही काम पडलं तर ते आपलं जठारपेठ ग्रुपमधील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि हे कार्यकर्ते लगेच हे सदस्य मदतीला धावून जातात. त्यांच्या या २४ कारसेवेबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.
 
मदत हवी, आम्हाला कॉल करा...
आपलं जठारपेठ ग्रुपमध्ये आदित्य दामले, सौरभ भगत, अमर बेलखेडे, राजेश पिंजरकर, सचिन गव्हाळे, मुकेश भिसे, विशाल बकाल, श्रीकांत आमले, राजेश बाळंखे यांचा समावेश असून, त्यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी त्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. ज्येष्ठांना मदत हवी असल्यास त्यांनी ९९७0५0३५२३, ९६७३४७१५११, ९0४९५९0३00 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
 
अनेक वाहनमालक आले समोर
आपलं जठारपेठने ज्येष्ठ नागरीकांसाठी सुरू केलेला उपक्रम पाहून, परिसरातील अनेक चारचाकी वाहन मालकांनी सुद्धा या युवकांना आपले वाहन उपलब्ध करून दिले. युवकांनी व्यवस्था केलेले दोन्ही वाहने उपलब्ध नसल्यास, वाहनमालक त्यांना आपले वाहन उपक्रम करून या उपक्रमात योगदान देतात आहेत.

Web Title: 24 Hours Car Service for Senior Citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.