"100 वर्षांचे असते तरी फरक पडला नसता..."; 24 वर्षाच्या तरुणीने 85 वर्षीय व्यक्तीशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 12:44 PM2023-05-07T12:44:47+5:302023-05-07T12:49:01+5:30

24 वर्षीय तरुणीने 85 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे.

24 year girl married with 85 year old man tells love story proposal | "100 वर्षांचे असते तरी फरक पडला नसता..."; 24 वर्षाच्या तरुणीने 85 वर्षीय व्यक्तीशी केलं लग्न

फोटो - आजतक

googlenewsNext

वयात 61 वर्षांचे अंतर असूनही 24 वर्षीय तरुणीने 85 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. ते 100 वर्षांचे असते तरी फरक पडला नसता असं तरुणीचं म्हणणं आहे. अमेरिकेमध्ये राहणारी मिरेकल पोग 2019 मध्ये चार्ल्स पोग यांनी भेटली. लवकरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. चार्ल्स हे निवृत्त रिअल इस्टेट एजंट आहे, तर मिरेकल ही व्यवसायाने नर्स आहे.

डेली एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, चार्ल्सने तिला फेब्रुवारी 2020 मध्ये प्रपोज केले होते. दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालले आहे. आता हे जोडपे कुटुंब सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यांच्या अनोख्या प्रेमकथेचे वर्णन करताना मिरेकल म्हणाली की, पहिल्या भेटीनंतर तिला चार्ल्सचे वय किती आहे हे माहित नव्हते. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम वाढू लागले. मग एके दिवशी संभाषणात चार्ल्सने मिरेकलला ​​तिची जन्मतारीख विचारली. मग वय कळलं. 

मिरेकल म्हणाला, 'मी त्यांच्या वयाचा कधीच विचार केला नाही. आम्हाला फक्त सर्वकाही कसे होते ते पाहायचे होते. ते 100 वर्षांचे आहेत की 55 वर्षांचे आहेत याने मला काहीच फरक पडत नाही. मला वाटलं की ते 60 किंवा 70 वर्षांचे असतील. कारण ते चांगले दिसतात. ते नेहमी सक्रिय असतात. 

ती पुढे म्हणाली, 'माझ्या आजोबांनी सांगितले की, मी आनंदी असेल तर काही फरक पडत नाही. पण माझे वडील खूप रागावले होते. त्यांचे मन वळवायला खूप वेळ लागला, मी त्यांना सांगितले की जर ते माझ्या लग्नाला आले नाहीत तर ते आपली मुलगी कायमची गमावतील. चार्ल्सशी बोलताच त्यांनी होकार दिला. आता हे जोडपे आयव्हीएफच्या मदतीने पालक बनण्याचा प्रयत्न करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 24 year girl married with 85 year old man tells love story proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.