समुद्राच्या खोल गुहेत उतरले होते वैज्ञानिक, २५ लाख वर्ष जुन्या गोष्टी पाहून झाले हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 03:17 PM2019-11-07T15:17:18+5:302019-11-07T15:22:40+5:30
अनेकदा अचानक शोधकार्य करताना वैज्ञानिकांच्या हाती असं काही लागतं जे बघून त्यांच्यासोबत जगही हैराण होतं.
(Image Credit : CEN/Erick Sosa-Kay Vilchis)
अनेकदा अचानक शोधकार्य करताना वैज्ञानिकांच्या हाती असं काही लागतं जे बघून त्यांच्यासोबत जगही हैराण होतं. असंच काहीसं मेक्सिकोतील मेडेरियाच्या चोलुल जिल्ह्यात झालं. इथे काही वैज्ञानिक २०३४ वर्ग फूट क्षेत्रात पसरलेल्या ९१ फूट खोल समुद्री गुहेत गेले होते. इथे त्यांना २५ लाख वर्ष जुन्या प्राण्यांचे अवशेष सापडल्याचं बोबलं जात आहे.
वैज्ञानिकांनुसार, या गुहेत जे अवशेष सापडले त्यात १३ वेगवेगळ्या प्रजातींच्या शार्कचे दात आहेत. हा अनोखा शोध गुहांचा शोध करणारे वैज्ञानिक विलिचिस जपाटा आणि फोटोग्राफर एरिक सोसा रॉड्रिग्ज यांनी लावलाय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैज्ञानिक विलिचिस जपाटा यांनी सांगितले की ते आणि त्यांचे सहकारी एरिक समुद्राच्या आतील गुहेच्या भिंतीकडे बघत होते. तेव्हाच तेथील काही टोकदार वस्तूंवर नजर गेली. जेव्हा त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात आलं की, ते दात आहे.
त्यानंतर ते सर्वच १३ दात काढून त्यांचं परिक्षण केलं. त्यातून समोर आलं की, हे दात शार्कच्या एका फार जुन्या प्रजातीचे दात आहेत. असे मानले जात आहे की, हे दात शार्कची विशेष प्रजाती मेगालोडॉनचे आहेत. त्यांचे दात आरीसारखे असायचे.
वैज्ञानिकांनुसार, या शोधातून समोर आलं आहे की, २५ लाख वर्षाआधी समुद्राखाली जीवन होतं. या अवशेषांना जॉक, सेनॉट नाव देण्यात आलं आहे. माया सभ्यतेत जॉकचा अर्थ शार्क असा होत होता. तर सेनॉटचा अर्थ नैसर्गिक खोली असा होत होता. वैज्ञानिकांना दातांसोबतच जीवाष्म सुद्धा सापडले आहेत. जे एखाद्या लुप्त जनावरांचे आणि मनुष्यांची हाडे शकतात. हे सर्व अवशेष गुहेच्या भिंतीवर चिकटलेले होते.