बापरे! एनर्जी ड्रिंकचं व्यसन पडलं महागात, दिवसाला प्यायचा असंख्य कॅन; झाली भयंकर अवस्था अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:54 PM2022-03-08T19:54:14+5:302022-03-08T19:55:33+5:30
Energy drinks : एका व्यक्तीसाठी एनर्जी ड्रिंक जीवघेणं ठरलं आहे. एनर्जी ड्रिंक पिणं त्याला चांगलंच महागात पडलं असून त्याचा मृत्यू झाला आहे.
आजकाल बाजारात एनर्जी ड्रिंकची मागणी (Energy drinks) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बरेच ते अत्यंत आवडीने पितात. एनर्जी ड्रिंक हे कोल्ड ड्रिंकसारखंच असतं पण यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं, जे एकप्रकारचं केमिकल कम्पाऊंड असतं. जास्त प्रमाणात कॅफिन शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे ब्रिटनमधील एका व्यक्तीसाठी एनर्जी ड्रिंक जीवघेणं ठरलं आहे. एनर्जी ड्रिंक पिणं त्याला चांगलंच महागात पडलं असून त्याचा मृत्यू झाला आहे.
द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षांच्या जस्टिन बार्थोलोम्यू (Justin Bartholomew) याला एनर्जी ड्रिंक पिण्याचं व्यसन लागलं होतं. यातच त्याचा मृत्यूच झाला. रिपोर्टनुसार लग्नानंतर फक्त तीन महिन्यांतच त्याचा घटस्फोट झाला, त्यामुळे तो खचला होता. डिप्रेशनमध्ये गेला. स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आणि इतर मेहनतीची कामं करण्यासाठी तो दररोज रेड बुलसारखी एनर्जी ड्रिंक प्यायचा. पण हळूहळू त्याला एनर्जी ड्रिंकचं व्यसन लागलं.
जस्टिनच्या वडिलांनी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, त्याला एनर्जी ड्रिंकचं असं व्यसन लागलं जसं लोकांना ड्रग्सचं लागतं. वडिलांनी आणि त्याच्या भावंडांनी त्याला एनर्जी ड्रिंक सोडण्यासाठी खूप समजावलं पण तरी तो ते सोडू शकला नाही. फॅब डेलीच्या रिपोर्टनुसार जास्त एनर्जी ड्रिंक प्यायल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार ब्रिटेनमध्ये तीनपैकी एक मुलगा आठवड्याला एकदा तरी एनर्जी ड्रिंक पितो.
एनर्जी ड्रिंकचे खूप दुष्परिणाम आहेत. जास्त प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं, झोप लागण्यात समस्या येते, डोकं दुखतं आणि पोटातही तीव्र वेदना होतात. जास्त शुगर असल्याने डायबेटिजची समस्याही होऊ शकते. फॅब डेलीच्याच एका रिपोर्टनुसार इंग्लंडमधील एका व्यक्तीला जास्त एनर्जी ड्रिंक प्यायल्याने हार्ट अटॅक आला होता. तर तीन मुलांची आई एनर्जी ड्रिंकच्या व्यसनामुळे एकाच दिवसात 15 लीटर एनर्जी ड्रिंक पिऊ लागली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.