समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, म्हणाले २५० आणखी असे जहाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:36 IST2024-12-25T12:35:45+5:302024-12-25T12:36:21+5:30

एका जहाजावर साधारण २२ टन सोनं आणि चांदी असेल. मॉन्टीरो यांचं मत आहे की, हा खजिना ज्याला मिळेल ती व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनेल.

250 sunken ship with treasure found on portugal coast | समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, म्हणाले २५० आणखी असे जहाज...

समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, म्हणाले २५० आणखी असे जहाज...

पोर्तुगालचे पुरातत्ववादी अलेक्झांडर मॉन्टीरो यांनी दावा केला आहे की, पोर्तुगालच्या आजूबाजूच्या समुद्रात २५० जहाज बुडालेले आहेत. ज्यांमध्ये कोट्यावधी रूपयांचा खजिना पडून आहे. एका जहाजावर साधारण २२ टन सोनं आणि चांदी असेल. मॉन्टीरो यांचं मत आहे की, हा खजिना ज्याला मिळेल ती व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनेल.

मॉन्टीरो यांचा दावा आहेकी, १५८९ मध्ये लिस्बनच्या दक्षिणेत एक स्पॅनिश गॅलियोन जहाज ट्रोजन बेटाजवळ बुडालं होतं. खासकरून सेनहोरा डो रोजारिया समुद्री भागात बुडालेल्या या जहाजात २२ टन सोनं आणि चांदी असण्याची शक्यता आहे. मॉन्टीरो म्हणाले की, त्यांनी एक खासप्रकारचा डेटाबेस तयार केला आहे.

आजूबाजूलाच ८६२० जहाज बुडाले

या डेटाबेसमध्ये मदीरा, अजोर्स आणि देशातील इतर भागांमध्ये खजिना असलेले जहाज कुठे कुठे बुडाले याची माहिती आहे. ही सगळी जहाजं १६व्या शतकापासून ते आतापर्यंतची आहेत. पोर्तुगालच्या आजूबाजूला बुडालेल्या जहाजांची संख्या साधारण ८६२० आहे. पण चिंता ही आहे की, पोर्तुगालकडे हा खजिना सुरक्षित ठेवण्याची आणि सांभाळण्याची सुविधा नाही.

देशातील आर्किओलॉजिस्ट म्हणतात की, खजिना लुटणारे चोर समुद्रातून आतल्या आतून खजिना लंपास करू शकतात. त्यांना रोखताही येणार नाही. त्यामुळे हे गरजेचं आहे की, आधी अशा जहाजांना शोधलं जावं. नंतर त्यांना सुरक्षित केलं जावं. त्यानंतर खजिना काढून सुरक्षित जागेवर ठेवला जावा.

पोर्तुगाल जगातील सगळ्यात मोठा कोलोनिअल राज्य आहे. १५ व्या आणि १७व्या शतकात पोर्तुगाल कधी दक्षिण अमेरिका, कधी आफ्रिका तर कधी ईस्ट-इंडियाचं कोलोनिअल राज्य होतं. जेव्हा पोर्तुगालचं कोलोनिअल राज्य संपलं तेव्हा ब्राझील, अंगोला, मोजाम्बिक आणि इतर स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झालं.

Web Title: 250 sunken ship with treasure found on portugal coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.