दीड लाख रूपयांना विकलं गेलं हे एक लिंबू, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:11 PM2024-02-02T16:11:21+5:302024-02-02T16:12:54+5:30

इथे एक जुनं कपाट विकलं जात होतं, अजब बाब म्हणजे या कपाटापेक्षा जास्त किंमत या कपाटात ठेवलेल्या लिंबाला मिळाली.

285 year old lemon sold for Rs one and half lakh in auction | दीड लाख रूपयांना विकलं गेलं हे एक लिंबू, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण

दीड लाख रूपयांना विकलं गेलं हे एक लिंबू, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण

अनेकदा असं बघितलं जातं की, ज्या गोष्टी दिसायला एकदम बेकार वाटतात त्यांना लिलावात खूप मोठी किंमत मिळते. दिसायला भलेही या गोष्टी कचरा किंवा बेकार वाटत असल्या तरी त्यांची किंमत हैराण करणारी असते. अशीच एक घटना इंग्लंडमधून समोर आली आहे. इथे एक जुनं कपाट विकलं जात होतं, अजब बाब म्हणजे या कपाटापेक्षा जास्त किंमत या कपाटात ठेवलेल्या लिंबाला मिळाली.

लिलावात अनेकदा अशा गोष्टी विकल्या जातात ज्या इतक्या महाग विकल्या जातील याची कल्पनाही नसते. आता एक लिंबू दीड लाख रूपयांना विकलं गेलं. सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की, लिंबात असं काय होतं? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लिंबात खास असं काही नव्हतं. पण लिलावात ते दीड लाख रूपयांना विकलं गेलं.

इंग्लंडमध्ये झालेल्या या लिलावाची सध्या चर्चा सुरू आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, इथे एक 285 वर्षापासून ठेवलेलं जुनं आणि सुकलेलं लिंबू दीड लाख रूपयांना विकलं गेलं. लिंबू साधारण 2 इंचाचं आहे आणि घरातील सफाई दरम्यान कपाटात आढळून आलं. ब्रेटेल्समध्ये झालेल्या लिलावादरम्यान सांगण्यात आलं की, हे लिंबू एका व्यक्तीला आपल्या काकाच्या 19व्या शतकातील एका छोट्या कपाटात ठेवलेलं आढळलं. जेव्हा लिलाव करणारा कपाटाचे फोटो काढत होतो तेव्हा त्याची नजर 285 वर्ष जुनं लिंबू दिसून आलं. हे लिंबू काळं पडलं होतं.

या लिंबावर एक खास मेसेज लिहिलेला होता. ‘मिस्टर पी लू फ्रैंचिनी द्वारा 4 नोव्हेंबर, 1739 ला मिस ई बॅक्सटरला देण्यात आलं होतं’. असं मानलं जात आहे की, लिंबू भारतातून इंग्लंडला एक रोमॅंटिक गिफ्ट म्हणून आणण्यात आल होतं. जेव्हा लिंबू लिलावात ठेवण्यात आलं तेव्हा अंदाज होता की, याला 4200 ते 6000 रूपये मिळतील. पण जेव्हा लिलाव झाला तेव्हा याला 1 लाख 47 हजार रूपये किंमत मिळाली. तर कपाट 3360 रूपयांना विकलं गेलं.
 

Web Title: 285 year old lemon sold for Rs one and half lakh in auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.