अरे व्वा! दरवर्षी 3 कोटी कमावते 'ही' तरुणी; एकाचवेळी 6 ठिकाणी काम करून करते बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 05:49 PM2022-05-01T17:49:36+5:302022-05-01T18:05:38+5:30

अलेक्झांड्रा फासुलो (Alexandra Fasulo) असं या मुलीचं नाव आहे. ही मुलगी एकाचवेळी सहा स्ट्रीममध्ये काम करून वर्षाला करोडो रुपये कमवते आहे.

29 year old girl makes more than 3 crore per year owns 3 properties know how | अरे व्वा! दरवर्षी 3 कोटी कमावते 'ही' तरुणी; एकाचवेळी 6 ठिकाणी काम करून करते बक्कळ कमाई

फोटो - सोशल मीडिया

googlenewsNext

फ्लोरिडातील एक 29 वर्षीय मुलगी तरुण वयातच कोट्यवधींची कमाई करत आहे. अलेक्झांड्रा फासुलो (Alexandra Fasulo) असं या मुलीचं नाव आहे. ही मुलगी एकाचवेळी सहा स्ट्रीममध्ये काम करून वर्षाला करोडो रुपये कमवते आहे. गेल्या वर्षी तिने फ्रीलान्स रायटिंग, इन्फ्ल्युएन्सर स्पॉन्सरशिप, ई-बुक सेल्स, कोर्स सेल्स, एड रिव्हेन्यू आणि एफिलिएटेड रिव्हेन्यू या माध्यमातून तीन कोटी रुपयांहून अधिक पैसे कमावले आहेत. विशेष म्हणजे तिने वयाची तिशी पूर्ण करण्याअगोदर स्वत:च्या मालकीची तीन घरंही खरेदी केली आहेत. 

सीएनबीसी डॉट कॉमवर, अलेक्झांड्रा फासुलोने तिचे अनुभव शेअर केले आहेत. ती म्हणाली की, 2018 मध्ये तिने फिव्हर (Fiverr) या मार्केटसाईटवर फ्रीलान्स रायटिंग करून आणि इतर कामातून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. क्लायंटसाठी ब्लॉग, प्रेस रिलीज आणि वेबसाइट कंन्टेट लिहिण्याचं काम केलं होतं. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी नऊ ते पाच अशी टिपिकल नोकरी करणं सोडलं पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे. अलेक्झांड्रा फासुलो इन्स्टाग्रामवरदेखील खूप अॅक्टिव्ह आहे. तिचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती स्वतःला फ्रीलान्स फेअरी म्हणवते. ती फ्रीलान्स फेअरीटेल्स नावाचा पॉडकास्ट सादर करते. 

फासुलो म्हणते की, मी नेहमीच इतके पैसे कमवू शकणार नाही. म्हणूनच मी सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटवर अधिक भर देते. होम स्टेट फ्लोरिडामध्ये तीन ठिकाणी माझी प्रॉपर्टी आहे. त्यांची एकूण किंमत नऊ कोटींहून जास्त आहे. मी माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी माझ्या कमाईतील मोठ्या हिस्सा बाजूला ठेवते. ती बचतीसाठी पाच मार्गांचा अवलंब करते. याबद्दलही तिने माहिती दिली आहे.

1) कपडे आणि हँडबॅग्ज - ज्या दुकानांमध्ये कपड्यांची किंमत जास्त नसेल अशा दुकानांमधून ती शॉपिंग करते. त्यामुळं कपड्यांच्या खर्चामध्ये बचत होते.

2) डिस्काउंट्सचा वापर - ती अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड वापरते. ते वापरल्यानंतर तिला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या पॉइंटचा वापर करून ती फ्लाइटची तिकिटे आणि स्वस्त भाड्याच्या कार मिळवते.

3) रेंट - मार्च 2021मध्ये तिनं पहिलं घर विकत घेतलं होतं. यानंतर, ऑक्टोबरमध्ये तिने मियामीमध्ये एक इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी खरेदी केली होती. याशिवाय मार्च 2022 मध्ये तिने आणखी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. या घरांच्या भाड्यातून तिला पैसे मिळतात.

4) हॅप्पी अवर्समध्ये ड्रिंक्स - ती दररोज सकाळी लवकर उठते. म्हणूनच ती हॅप्पी अवर्सचा पुरेपुर फायदा करून घेते. हॅप्पी अवर्समध्ये जेवण-खाणं आटोपल्यास मोठ्या प्रमाणात बचत होते.

5) उबर ट्रिपचा - चार ते पाच किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील प्रवास करण्यासाठी ती उबरचा वापर करत नाही. इतक्या अंतरावरील प्रवास ती पायी करते. पैशांची बचतही होते आणि व्यायामही होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 29 year old girl makes more than 3 crore per year owns 3 properties know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.