कधी विचार केलाय का टॉयलेट पेपर नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या तीन कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:54 PM2021-10-23T16:54:31+5:302021-10-23T17:03:37+5:30
कधी तुम्ही याचा विचार केलाय का की टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? टिश्यू पेपर भलेही प्रिंटेड आणि रंगीबेरंगी येत असतील, पण टॉयलेट पेपर नेहमीच पांढरेच असतात.
भलेही पाश्चिमात्य देशांच्या तुलनत आपल्या देशात टॉयलेट पेपरचा वापर करण्याचं चलन फार कमी आहे. पण हळूहळू यात वाढ होत आहे. आधी केवळ हॉटेल्समधील वॉशरूममद्ये पेपर टिश्यू दिसत होते. आता ऑफिस आणि अनेक घरांमद्ये यांचा वापर सुरू झाला आहे. तुम्हीही अनेकदा टॉयलेट पेपरचा वापर केला असेलच. पण कधी तुम्ही याचा विचार केलाय का की टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? टिश्यू पेपर भलेही प्रिंटेड आणि रंगीबेरंगी येत असतील, पण टॉयलेट पेपर नेहमीच पांढरेच असतात.
काय आहे कारण?
टॉयलेट पेपर नेहमीच पांढऱ्या रंगाचा असण्यामागे काही नियम नाही. पण असं असण्यामागे वैज्ञानिक आणि कमर्शिअल कारण आहे. त्यासोबतच पर्यावरणाच्या सुरक्षेबाबतही टॉयलेट पेपरचा रंग पांढरा ठेवला जातो. याचं एक कारण म्हणजे ब्लीच करण्याआधी पेपरचा रंग भुरका असतो. ब्लीच केल्यावर पेपरचा रंग पांढरा होतो. भुरक्या रंगाला कलर करण्याच्या तुलनेत ब्लीच करायला कमी खर्च येतो. त्यामुळे टॉयलेट पेपरची किंमत कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कंपन्या ते पांढरेच ठेवतात.
टेक्नॉलॉजी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, पर्यावरणाच्या नजरेने बघायचं तर पांढरा टॉयलेट पेपर रंगीत पेपरच्या तुलनेत लवकर डीकंपोज होतो. त्यामुळे याचा रंग पांढरा ठेवणं फायद्याचं आहे. सोबतच रंगीन पेपरच्या वापराने आरोग्यासंबंधी समस्या होऊ नये, त्यामुळे डॉक्टरही पांढऱ्या टॉयलेट पेपरला चांगलं मानतात.
काही कंपन्यांनी केले प्रयोग
टॉयलेट पेपर पांढरा ठेवण्यामागे इतकी महत्वाची कारणे असूनही काही कंपन्यांनी रंगीन किंवा प्रिंटेड टॉयलेट पेपरच्या प्रॉडक्शनचा प्रयत्न केला होता. पण ते चलनात येऊ शकले नाहीत. जगातल्या साधारण सर्वच देशांमध्ये टॉयलेट पेपर पांढराच वापरला जातो.