अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:14 PM2020-08-11T19:14:12+5:302020-08-11T19:16:14+5:30
फक्त ३६ स्वेअर फुट असलेल्या या रिक्षामधल्या घरात बेडरूम, लिविंग रूम, टॉयलेट, बाथटब, काम करण्याची जागा सारं काही आहे.
आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपापल्या परीने कष्ट करून घरं उभारण्याची तयारी लोक करतात. आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या घराबद्दल सांगणार आहोत. असं भन्नाट घरं तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल. हे घरं तयार करण्यासाठी बांधाणाऱ्यानं कलात्मकता वापरलेली तुम्हाला दिसून येईल. फक्त ३६ स्वेअर फुट असलेल्या या रिक्षामधल्या घरात बेडरूम, लिविंग रूम, टॉयलेट, बाथटब, काम करण्याची जागा सारं काही आहे.
इतकंच नाही तर २५० लिटरची पाण्याची टाकी सुद्धा आहे. ६०० वॅट सोलार पॅनल आणि कपडे सुकवण्याची सुविधाही आहे. हे घरं तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या अरूण प्रभू या तरूणाने तयार केलं आहे. अरूणचे वय २३ वर्ष आहे. हे घर तयार करण्यासाठी या तरूणाला जवळपास १ लाख रुपयांचा खर्च आला.'द बेटर' इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये अरूणने मुंबई आणि चेन्नईच्या स्लम एरियांचा अभ्यास केला.
या अभ्यासादम्यान अरूणला दिसून आलं की झोपड्या तयार करण्यासाठी सुद्धा ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यात टॉयलेटची सुविधाही नसते. म्हणून अरूणने एक लाख रुपयांत 'सोलो ०.१' तयार करून समस्येवर मार्ग काढला आहे. हे घर अरूणने थ्री- व्हिलर आणि रिसायकल्ड वस्तूंपासून तयार केलं आहे. हे घर तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला.
गरीब, मजूर आणि लहान दुकानदारांना घर उपलब्ध व्हावं या उद्देशानं हे घर तयार केलं आहे. अरूण तामिळनाडूच्या नमक्कम पारामधी वेल्लोरचा रहिवासी आहे. त्यांनी सेकेंड हँण्ड बजाज थ्री व्हिलरचा वापर करून हे घरं तयार केलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कंपनी बिलबोर्डच्या सहयोगानं रिक्षातील हे घर बनवलं आहे.
हे पण वाचा :
कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं
घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!
शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल