झोपली तेव्हा तिचं वय 32 होतं, जेव्हा उठली तेव्हा झाली होती 17 ची; नवरा आणि मुलगीही विसरली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:50 AM2023-02-15T10:50:04+5:302023-02-15T10:50:49+5:30
32 Year Old Woman Felt 17 Again After a Nap : नेल्श पिले (Nesh Pillay) नावाची 32 वर्षीय महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तिला तिच्या आयुष्याबाबत सगळं काही आठवत होतं. पण झोपेतून उठल्यानंतर तिचं वय 17 वर्षे झालं होतं.
32 Year Old Woman Felt 17 Again After a Nap : मनुष्याचं शरीर असं आहे ज्यात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कधी कधी तर धडधाकट माणसाला अशा काही समस्या होतात की, परिवारातील लोक हैराण होतात. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती एका झटक्यात मध्यम वयातून टीएजमध्ये पोहोचली. ती झोपेत असतानाच तिच्यासोबत हा अजब प्रकार घडला.
नेल्श पिले (Nesh Pillay) नावाची 32 वर्षीय महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तिला तिच्या आयुष्याबाबत सगळं काही आठवत होतं. पण झोपेतून उठल्यानंतर तिचं वय 17 वर्षे झालं होतं. ना तिला तिच्या मुलीबाबत काही आठवत होतं ना तिच्या जुन्या आयुष्याबाबत. 6 वर्षाच्या मुलीची आई स्वत:ला टीएजर मानत होती. मजेदार बाब म्हणजे ती तिच्या पार्टनरला सुद्धा विसरली होती. पण सुदैवाने पुन्हा एकदा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली.
नेल्शला डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा ते म्हणाले की, डोक्याला झालेल्या जुन्या जखमेमुळे आणि काही सर्जरीज़मुळे तिची ही स्थिती झाली आहे. ती तिच्या जीवनाचा एक मोठा काळ विसरली होती. जो सगळ्यात महत्वाचा होता. अशात कधी कधी तिला थोड्या थोड्या वेळाने गोष्टी आठवतात.
मिररच्या रिपोर्टनुसार, महिला तिच्या पार्टनर टॅक्सी ड्रायव्हर समजली होती आणि तिला अनेकदा आठवण द्यावी लागत होती की, तो कोण आहे. तिला तिची मुलगीही आठवत नव्हती आणि ती मुलीला केवळ लहान मुलगी समजत होती. इतकंच काय तर ती असंही म्हणत होती की, लहान मुलांना सांभाळणं तिला येतच नाही.
मजेदार बाब म्हणजे नेल्श या पूर्ण प्रक्रियेत पुन्हा एकदा आपल्याच पार्टनरच्या प्रेमात पडली. ती जुनं सगळं काही विसरली होती. पण तिला तिच्या पार्टनरसोबत सगळं काही नवीन वाटत होतं. तिने स्वत: त्याला लग्नासाठी विचारलं आणि 20 जानेवारीला पुन्हा एकदा आपल्या पार्टनरसोबत जीवनाला सुरूवात केली. आता तिला कॉफी, अल्कोहोल आणि तणावापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. ती 9 वर्षांची असताना तिचा एक अपघात झाला होता, ज्यामुळे तिच्या मेंदूला इजा झाली होती.