IVF : पतीचा मृत्यू झाला, नऊ महिन्यांनी प्रेग्नंट झाली महिला; प्रेमासाठी सायन्स जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 12:38 PM2022-03-27T12:38:53+5:302022-03-27T12:40:11+5:30

IVF : पतीच्या मृत्यूनंतर ३३ वर्षीय महिला झाली गर्भवती. ९ महिने स्टोअर करून ठेवले होते स्पर्म.

33 year old widow who used her late husband frozen sperm to conceive through ivf said story in podcast | IVF : पतीचा मृत्यू झाला, नऊ महिन्यांनी प्रेग्नंट झाली महिला; प्रेमासाठी सायन्स जिंकले

IVF : पतीचा मृत्यू झाला, नऊ महिन्यांनी प्रेग्नंट झाली महिला; प्रेमासाठी सायन्स जिंकले

googlenewsNext

लॉरेन मॅकग्रेगर सिंगल मॉम आहे. काही काळापूर्वीच त्यांच्या पतीचं ब्रेन ट्युमरमुळे निधन झालं. निधनापूर्वी आपल्या बाळाला पाहू शकेल अशी लॉरेन यांची इच्छा होती. दोघांच्या हसत्या खेळत्या आयुष्यात ब्रेन ट्युमर आला आणि आपलं संपूर्ण जगच बदललं असं ३३ वर्षीय लॉरेन यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलं. 

२०१९ मध्ये त्यांनी बाळासाठी निर्णय घेतला. परंतु तोवर त्यांचा पती क्रिस याचा आजार खुप वाढला होता. याचवेळी दोघांनी किमो थेरेपीपूर्वी क्रिसचे स्पर्म फ्रीज करण्याचा निर्णय घेता. याचदरम्यान, जगभरात कोरोनाची महासाथही आली. त्यामुळे वैद्यकीय सोयी-सुविधांवरही त्याचा परिणाम झाला. अखेर २०२० मध्ये क्रिस यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी लॉरेन यांनी इन विट्रो फर्टिलायझेशनचा (IVF) निर्णय घेतला. क्रिस अद्यापही आपल्या सोबतच आहे असं आपल्याला वाटत असल्याचंही त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं.

यापूर्वीच्या रिलेशनशिपपासूनही क्रिस याला एक मुलगा होता. तरीही आपलं एक बाळ असावं असा निर्णय क्रिस आणि लॉरेन यांनी घेतला. २०१३ मध्ये क्रिस यांना ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं. परंतु कालांतरानं २०१७ मध्ये क्रिस यांच्यावर किमो थेरेपी करण्यापूर्वी त्यांनी त्यापूर्वी स्पर्म फ्रीज करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर स्पर्म फ्रीज करण्यासाठी त्यांना एक बँकही मिळाली. "आम्ही कधीही विचार केला नव्हता की आम्हाला अशा कोणत्या गोष्टीची गरज भासेल," असं लॉरेननं सांगितलं. आपण यापूर्वीच क्रिसशिवाय बाळाचा सांभाळ करण्याबाबतच्या शक्यतांवर चर्चा केली होती. इतकंच नाही, तर नावाचाही विचार केला होता. त्यामुळे बाळाला तेच नाव देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: 33 year old widow who used her late husband frozen sperm to conceive through ivf said story in podcast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.