बाबो! एक वर्षापासून महिला घोटभरही प्यायली नाही पाणी, दूर झाल्या शरीराच्या 'या' समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:22 PM2020-02-10T12:22:17+5:302020-02-10T12:25:29+5:30

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं असा सल्ला नेहमीच आपण सगळ्यांकडून ऐकत असतो. पण इंडोनेशियातील ३५ वर्षीय सोफी पार्तिकने गेल्या एक वर्षापासून पाण्याचा एक घोट प्यायला नाहीये.

35 year old yoga instructor who has not drunk water in a year | बाबो! एक वर्षापासून महिला घोटभरही प्यायली नाही पाणी, दूर झाल्या शरीराच्या 'या' समस्या!

बाबो! एक वर्षापासून महिला घोटभरही प्यायली नाही पाणी, दूर झाल्या शरीराच्या 'या' समस्या!

googlenewsNext

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं असा सल्ला नेहमीच आपण सगळ्यांकडून ऐकत असतो. पण इंडोनेशियातील ३५ वर्षीय सोफी पार्तिकने गेल्या एक वर्षापासून पाण्याचा एक घोट प्यायला नाहीये. व्यवसायाने न्यूट्रिशन कोच आणि योगा टिचर सोफी ड्राय फास्टिंग करत आहे. म्हणजे यात ती अजिबात पाणी पित नाही. पण जिवंत राहण्यासाठी ती नारळाचं पाणी, फळांचा ज्यूस सेवन करते.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सोफी दररोर १३ ते १४ तास ड्राय फास्ट करते. तिचा दावा आहे की,  ती शरीराला फळं, भाज्या, ज्यूस आणि नारळाच्या पाण्यानेच सर्वच पोषक तत्त्व देण्यास सक्षम आहे. तिने सांगितले की, असं करून तिची सांधेदुखी, डोळ्यांची सूज, फूड अ‍ॅलर्जी, त्वचेच्या समस्या आणि पचनाची समस्या दूर झाली.

सोफीने सांगितले की, 'माझ्या चेहऱ्यावर आणि गुडघ्यावर फार सूज राहत होती. त्यामुळे मी फार आजारी वाटत होती. जेव्हा मी डॉक्टर्सकडे गेली तेव्हा डॉक्टर म्हणाले की, मला काहीच झालेलं नाही. जर डोळ्यांच्या सुजेमुळे समस्या होत असेल तर सर्जरी करावी लागले. त्यानंतर मला माझ्या एका मित्राने ड्राय फास्टिंगबाबत सांगितले. ही फास्टिंग सुरू करण्याआधी मी यावर बराच रिसर्च केला'.

सोफी सांगते की, 'बॉटलमधील पाणी प्यायल्याने आणि नळातील पाणी प्यायल्याने आपली किडनी ओव्हरवर्क करू लागते. ज्यामुळे शरीरातून सर्वच पोषक तत्व बाहेर निघून जातात. आपल्याला हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही ड्राय फास्टिंग सुरू करता तेव्हा लवकरच हे जाणवू लागतं की, आपल्या शरीराला पाणी गरज नाही'.

सोफीचं स्वप्न आहे की, तिला विना लिक्विड घेता १० दिवस घालवायचे आहेत. पण आतापर्यंत ती एकदा ५२ तासच ड्राय फास्टिंग करू शकली. सोफी कुणालाही ड्राय फास्टिंग करण्याचा सल्ला देत नाही. तिने लोकांना सल्ला दिला आहे की, जर त्यांना असं काही करायचं असेल तर त्यांनी सुरूवात केवळ फळं आणि भाज्या खाऊन करावी.


Web Title: 35 year old yoga instructor who has not drunk water in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.