विमानाच्या अपघातानंतर घनदाट जंगलात हरवली होती 4 मुले, 40 दिवसांनी अशा स्थितीत सापडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:29 PM2023-06-13T13:29:35+5:302023-06-13T13:31:13+5:30

Children survived 40 days in forest : जगातल्या सगळ्यात खतरनाक जंगलांपैकी असलेल्या जंगलात कुणी 40 दिवस कसं राहू शकेल? आज आम्ही तुम्हाला अशा 4 बहादूर मुलांची कहाणी सांगणार आहोत जी वाचून तुम्ही थक्क व्हाल.

4 children found after 40 days after plane crash in Amazon forest | विमानाच्या अपघातानंतर घनदाट जंगलात हरवली होती 4 मुले, 40 दिवसांनी अशा स्थितीत सापडले!

विमानाच्या अपघातानंतर घनदाट जंगलात हरवली होती 4 मुले, 40 दिवसांनी अशा स्थितीत सापडले!

googlenewsNext

Children survived 40 days in dense forest : जंगलात जर मनुष्य राहत असतील तर विना सुविधा तिथे राहणं किती अवघड असतं हे तुम्ही अनेक सिनेमे किंवा टीव्ही शोजमध्ये पाहिलं असेल. जंगली प्राण्यांची भिती पदोपदी असते. अशात जरा विचार करा की, जगातल्या सगळ्यात खतरनाक जंगलांपैकी असलेल्या जंगलात कुणी 40 दिवस कसं राहू शकेल? आज आम्ही तुम्हाला अशा 4 बहादूर मुलांची कहाणी सांगणार आहोत जी वाचून तुम्ही थक्क व्हाल.

ही थरारक कहाणी आहे 4 अशा मुलांची ज्यांची वयं 11 महिन्यांपासून 13 वर्षे आहे. ही मुलं ज्या विमानात आपल्या आईसोबत प्रवास करत होते, ते विमान अ‍ॅमेझॉनच्या जंगलात क्रॅश झालं होतं. नंतर तीन लोकांचे मृतदेह तर सापडले पण चार मुलं गायब होती. त्यांना शोधण्याची मोहिम सुरू झाली. पण पुढील 40 दिवस त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. जेव्हा ते सापडण्याची अपेक्षा संपत आली तेव्हा ते अशा स्थितीत आढळून आले की, त्यांना बघून कुणाचंही हृदय पिळवटून निघेल.

चार मुलांची वयं 13, 9, 4 वर्ष आणि एकाचं वय 11 महिने होतं. कोलंबियाच्या सैनिकांनुसार, मुलांकडे विमान असलेलं 3 किलो पीठ होतं. विमानाच्या अपघातानंतर त्यांनी हेच खाऊन दिवस काढले. हे पीठ संपल्यावर त्यांनी असं ठिकाण निवडलं जिथे ते जिवंत राहू शकतील. फळं, मूळं आणि झाडांच्या बीया खाऊन त्यांनी आपली भूक भागवली. असं करत ते 40 दिवस जिवंत होते. यातील सगळ्यात मोठ्या मुलीला जंगलात राहण्याबाबत थोडीफार  माहिती होती. तिच्या सांगण्यानुसार इतर मुले वागत होते.

जंगलाच्या ज्या भागात विमानाचा अपघात झाला होता तिथे रेस्क्यू टिमने काही खाण्याचे काही पॅकेट फेकले होते जेणेकरून मुलांच्या हाती लागावे. पण ते अपघाताच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर आढळून आले. 40 दिवसात ते 5 किलोमीटर चालले. जिथे ही मुलं सापडली तिथे जंगल फार घनदाट होतं. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करावं लागलं. त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: 4 children found after 40 days after plane crash in Amazon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.