या युवतीची आहेत ४० भावंड, कारण वडील करतात 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 09:10 PM2022-08-11T21:10:38+5:302022-08-11T21:13:31+5:30

अमेरिकेतील लॉस एँजिलिस येथे (America) राहणाऱ्या एका तरूणीने तिच्या 40 बहीण-भावांना शोधून काढत त्यांची भेट घेतली.

40 siblings of young woman in america as her father is sperm donor | या युवतीची आहेत ४० भावंड, कारण वडील करतात 'हे' काम

या युवतीची आहेत ४० भावंड, कारण वडील करतात 'हे' काम

Next

आज रक्षाबंधन, म्हणजेच भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव. परदेशात या सणाचे महत्व एवढे नसेल कदाचित, तिथे तो जास्त साजराही होत नाही. पण म्हणून भावा-बहिणीचे प्रेम कमी होत नाही. ते साजरी करण्याची पद्धत मात्र थोडी वेगळी. पण आजच्याच दिवशी बहीण-भावांच्या नात्याची एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेतील लॉस एँजिलिस येथे (America) राहणाऱ्या एका तरूणीने तिच्या 40 बहीण-भावांना शोधून काढत त्यांची भेट घेतली.

क्रिस्टा बिल्टन असे तिचे नाव असून तिचे वडील एक स्पर्म डोनर (Sperm Donor) होते. त्यामुळे तिच्या एकूण भावंडांची संख्या 100ही असू शकते. क्रिस्टाने एक पुस्तक लिहीले आहे, त्यामध्ये तिने आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गुपिते खुली केली आहेत. ‘ A Normal Family : The Surprising Truth About My Crazy Childhood’, असे या पुस्तकाचे (book) नाव आहे. क्रिस्टाच्या सांगण्यानुसार, तिला एकूण 100 (गुप्त) भाऊ-बहीण असू शकतात, कारण तिचे वडील हे एक स्पर्म डोनर होते. मी चुकून माझ्याच एखाद्या सावत्र भावासोबत डेटवरही गेले असेन, अशी शंकाही तिने व्यक्त केली आहे. क्रिस्टा आता विवाहीत आहे. तिने एका ब्रिटीश पत्रकाराशी लग्न केले आहे.

क्रिस्टा जेव्हा 23 वर्षांची झाली तेव्हा तिला कळलं की तिचे वडील, जेफ्री हॅरिसन हे तिच्याशिवाय इतर मुलांचेही वडील आहेत. जेफ्री हे स्पर्म डोनर होते. 1980 च्या दशकात जेफ्री यांनी क्रिस्टा यांची आई डेब्रा यांना स्पर्म डोनेट केले होते. डेब्रा यांनीच क्रिस्टाला तिच्या वडीलांबद्दल माहिती दिली होती.

क्रिस्टा हिच्या सांगण्यानुसार, त्यावेळी ( 80च्या दशकात) स्पर्म डोनेशनवर कोणतेही नियमन नव्हते. क्रिस्टा यांची आई, लेस्बियन होती. त्यांना मद्यपान आणि ड्रग्सचे व्यसन लागले होते. त्यामुळे क्रिस्टा आणि तिची बहीण कॅथन यांचे पालनपोषण नीट होऊ शकले नाही. या सर्व गोष्टी क्रिस्टाने तिच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी, अनुभव तिने या पुस्तकात लिहीले आहेत. अनेक गुपितं उलगडली आहे.

क्रिस्टा तिच्या 40 भावा-बहिणींना ओळखते, ती त्यांना भेटलीही आहे. मात्र तिला असं वाटतं की तिला अजून भावंडे असतील, त्यांची संख्या 100 पर्यंत असू शकते. क्रिस्टाने तिचे वडील जेफ्री यांची बरेच वेळा भेट घेतली आहे. मात्र त्यांच वागणं थोडं विचित्र असतं, असेही तिने नमूद केले आहे.

Web Title: 40 siblings of young woman in america as her father is sperm donor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.