15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत महिला शिक्षिकेचं होतं रिलेशनशिप, लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:46 PM2024-03-28T13:46:32+5:302024-03-28T13:47:27+5:30
एका 40 वर्षीय महिला टीचरवर आरोप आहे की, ती तिच्या एका विद्यार्थिनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
लैंगिक शोषणाच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. काही घरातील मोठे व्यक्ती तर कधी शाळेतील शिक्षक किंवा शिक्षिका लहान मुला-मुलींची शोषण करतात. अशाच एका 40 वर्षीय महिला टीचरवर आरोप आहे की, ती तिच्या एका विद्यार्थिनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचं नातं तेव्हा सुरू झालं जेव्हा या विद्यार्थिनीचं वय 15 होतं. महिलेचं नाव स्टेसी मिशेल वॉकर आहे. ही घटना अमेरिकेतील आहे. स्टेसी सॅन डिएगो सुपीरिअर कोर्टात हजर झाली होती. तिने तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांपैकी 17 आरोपांमध्ये ती निर्दोष असल्याचं सांगितलं.
डेप्युटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी वॅनेसा गेरार्ड म्हणाल्या की, जर स्टेसी दोषी आढळली तर तिला 13 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, गेरार्ड म्हणाल्या की, स्टेसी वॉकर आपल्या विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंधात होत्या. जेव्हा ती 15 वर्षाची होती.
पुढील दोन वर्षात हे नातं लैंगिक संबंधात बदललं. पोलिसांनी सांगितलं की, हे रिलेशनशिप 2017 ते 2019 पर्यंत चाललं. पण समोरील वकिलांनी हे नातं 2018 मध्ये सुरू झालं आणि मे 2019 मध्ये संपल्याचं म्हटलं.
20 मार्चला अटक झाल्यानंतर स्टेसी तुरूंगात आहे. पण गुन्हेगारीचा इतिहास नसल्याने आणि समाजासाठी केलेल्या कामामुळे जामिनाची रक्कम कमी करून 150,000 डॉलर करण्यात आली.
या केसमध्ये स्टेसीचे वकील डेविड बोर्तजे यांनी काही बोलण्यास नकार दिला. या आठवड्याच्या सुरूवातीला पोलिसांनी आरोप लावत सांगितलं की, स्टेसीने जेव्हा मुलीसोबत बोलणं सुरू केलं तेव्हा ती मुलगी 15 वर्षाची होती. हे रिलेशनशिप फोटो, व्हिडीओ आणि मेसेज शेअर करून सुरू झालं. दोघी अनेकदा भेटल्या आणि त्यांच्या संबंधही झाले. असं तोपर्यंत सुरू होतं जोपर्यंत विद्यार्थीनी 18 वर्षाची झाली.
गेरार्डचं म्हणणं आहे की, हे कथित रिलेशनशिप तेव्हा संपलं जेव्हा ही मुलगी 2020 मध्ये 18 वर्षाची झाली. पीडित मुलगी गेल्यावर्षी जुलैमध्ये पोलिसांकडे आली होती.
पोलिसांनी ऑगस्टमध्ये पॉवे यूनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टला या घटनेची माहिती दिली. यानंतर स्टेसीला सुट्टीवर पाठवण्यात आलं. यावर्षी तिने शाळेत मुलांना शिकवलं नाही. आता पुढील सुनावणी 15 मे रोजी होईल.