गुहेत सापडली ४० हजार वर्ष जुनी बांगडी, चमक पाहून वैज्ञानिक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:26 PM2019-10-04T16:26:26+5:302019-10-04T16:41:39+5:30

वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, हा दागिना आतापर्यंत शोधण्यात आलेल्या दानिन्यांपैकी सर्वात जुना आहे. 

40000 year old bracelet found in Siberia made by extinct human species | गुहेत सापडली ४० हजार वर्ष जुनी बांगडी, चमक पाहून वैज्ञानिक झाले हैराण

गुहेत सापडली ४० हजार वर्ष जुनी बांगडी, चमक पाहून वैज्ञानिक झाले हैराण

Next

(Image Credit : dailymail.co.uk)

सायबेरियामध्ये वैज्ञानिकांनी एक अनोखा शोध लावला आहे. त्यांना एक प्राचीन काळातील बांगडी मिळाली असून ही बांगडी ४० हजार वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, हा दागिना आतापर्यंत शोधण्यात आलेल्या दानिन्यांपैकी सर्वात जुना आहे. 

(Image Credit : dailymail.co.uk)

ही बांगडी सायबेरियातील डेनिसोवा गुहेत आढळून आली. इथेच एक लाख २५ हजार वर्षांआधी विलुप्त झालेल्या जनावरांची कथित रूपाने हाडे देखील मिळाली आहेत. या गुहेचं नाव डेनसोवन लोकांवरून ठेवण्यात आलं आहे. ही मानवांची एक रहस्यमय प्रजाती मानली जाते. 

(Image Credit : unbelievable-facts.com)

डेनिसोवन्स अनेक दृष्टीने अद्वितीय होते, जे जवळपास १० लाख वर्षाआधी इतर मानवी प्रजातींपासून वेगळे झाले होते. काही दिवसांपूर्वीच वैज्ञानिकांना एका डेनिसोवन महिलेच्या बोटाचं हाड आणि दात सापडले होते. ज्यातून हे समोर आलं होतं की, त्यांच्यात आणि निएंडस्थल किंवा आधुनिक मनुष्यात कोणतीही समानता नव्हती.

(Image Credit : unbelievable-facts.com) (त्यावेळी बांगडी अशी दिसत असावी असा अंदाज)

हजारो वर्षांआधी विलुप्त होण्याआधी डेनिसोवन्स काही काळासाठी आधुनिक मनुष्यांसोबत आणि निएंडस्थलांसोबत(एक जुनी मानवी प्रजाती) राहत होते. त्यांच्या सापडलेल्या अवशेषांच्या आनुवांशिक अभ्यासातून हे स्पष्ट होतं. तसेच असंही अभ्यासातून असंही समोर येतं की, डेनिसोवन्स कदाचित आधुनिक मनुष्यांच्या तुलनेत अधिक मजबूत आणि शक्तीशाली होते. 

(क्लोराइट दगड) (Image Credit : Flickr)

आता या बांगडीच्या शोधातून हे समोर येतं की, हे तयार करण्याच्या पद्धतीवरून ही पद्धत ३० हजार वर्ष जुनी असल्याचे समजते. आतापर्यंत वैज्ञानिकांचं मत होतं की, याप्रकारची कला केवळ नवपाषाण काळात मनुष्यात विकसित झाली होती. 

रिसर्चमधून समोर आलं की, ही बांगडी क्लोराइट नावाच्या दगडापासून तयार करण्यात आली आहे. तसेच ही बांगडी फार नाजूक आहे. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, अशा बांगड्या कदाचित एखाध्या विशेष व्यक्तीसाठी खास निमित्ताने तयार केले जात होते. जसे की, डेनिसोवन राजकुमारीसाठी.

(Image Credit : digitaljournal)

वैज्ञानिक या बांगडीची चमक पाहून हैराण झाले आहेत. कारण उन्हाची किरण यावर पडताच ती चमकू लागते. रात्री आगीच्या प्रकाशात यातून हिरवा प्रकाश येतो. वैज्ञानिकांना संगमरवरापासून तयार केलेली एक अंगठी देखील मिळाली आहे. पण याबाबत त्यांनी काहीही खुलासा केला नाही. 

Web Title: 40000 year old bracelet found in Siberia made by extinct human species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.