'बाप'रे! वयाच्या ४१ व्या वर्षी तो बनला ५५० मुलांचा बाप; शेकडो महिलांना असा दिला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:22 PM2023-03-28T21:22:20+5:302023-03-28T21:22:51+5:30

बाप होण्याची भावना ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तुम्हीही एक वडील असाल तर तुम्हालाही याची कल्पना येईल.

41 year old man from netherlands is accused of fathering more than 550 babies through sperm donation | 'बाप'रे! वयाच्या ४१ व्या वर्षी तो बनला ५५० मुलांचा बाप; शेकडो महिलांना असा दिला धोका

'बाप'रे! वयाच्या ४१ व्या वर्षी तो बनला ५५० मुलांचा बाप; शेकडो महिलांना असा दिला धोका

googlenewsNext

बाप होण्याची भावना ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तुम्हीही एक वडील असाल तर तुम्हालाही याची कल्पना येईल. सध्या लोक एक-दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालत नाहीत. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीबद्दल असं ऐकलं की त्यांना ८ ते १० मुले आहेत तर साहजिकच आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु सध्या एका अशा व्यक्तीची जगभरात चर्चा होत आहे, ज्याची ८-१० नाही तर ५०० पेक्षा जास्त मुलं आहेत. या व्यक्तीची विचित्र कहाणी नक्कीच आश्चर्यकारक आहे. 

जगात असे अनेक लोक आहेत जे वंध्यत्वाच्या समस्येनं त्रस्त आहेत. पण अशा लोकांसाठी अनेक प्रकारचे वैद्यकीय उपचार देखील उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे मुल होणं सोपं झालं आहे. स्पर्म डोनेशनचा ट्रेंडही खूप आहे. भारतात तशी फारशी नाही, पण परदेशात याला खूप मागणी आहे. आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत तो याच स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून ५०० हून अधिक मुलांचा बाप झाला आहे. पण तो आता अडचणीत सापडला आहे. 

शेकडो महिलांनी केली तक्रार
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जोनाथन जेकब मेजर असे या व्यक्तीचे नाव असून तो नेदरलँडचा रहिवासी आहे. ४१ वर्षीय जोनाथनवर शेकडो महिलांनी गुन्हा दाखल केला आहे. तो म्हणतो की तो त्याच्या मुलांचा एकुलता एक पिता आहे. २०१७ पर्यंत, जोनाथन १०२ मुलांचा बाप बनला होता कारण त्याने नेदरलँड्समधील १० वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये त्याचे शुक्राणू दान केले होते.

५५० मुलांचा झाला बाप
महिलांच्या म्हणण्यानुसार, पुरुषावर ५५० मुलांना जन्म दिल्याचा आरोप आहे. न्यायालयानं त्याला स्पर्म डोनेट करण्यास बंदी घातली असतानाही त्यानं काही आदेश पाळला नाही. दुसरीकडे, वैद्यकीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार जर मुलांना कधी कळले की त्यांना जगभरात इतकं भावंडं आहेत, तर त्याचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. एवढंच नाही तर याबाबत त्यांना कळालं नाही तर त्यांच्या लग्नावेळीही अडचणी निर्माण होऊ शकतात.

Web Title: 41 year old man from netherlands is accused of fathering more than 550 babies through sperm donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.