वयस्कर माणसाला हवीय फक्त महिला रुममेट, त्यासाठी केली जाहिरात, अटी पाहुन नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 07:56 PM2022-04-24T19:56:31+5:302022-04-24T20:00:01+5:30

नेहमीच प्रत्येकाला चांगला वा चांगली रुममेट मिळत नाही. त्यामुळे एका व्यक्तीने आपल्या सोबत राहण्यासाठी रुममेटची जाहिरात काढली आहे.

44 year old man advertisement for female room mate with weird conditions | वयस्कर माणसाला हवीय फक्त महिला रुममेट, त्यासाठी केली जाहिरात, अटी पाहुन नेटकरी चक्रावले

वयस्कर माणसाला हवीय फक्त महिला रुममेट, त्यासाठी केली जाहिरात, अटी पाहुन नेटकरी चक्रावले

googlenewsNext

घरापासून लांब राहणारे दुसरीकडे राहत असताना एखादा रुममेटबरोबर राहतात. कारण अनेकदा ते सोयीचं असतं. प्रत्येकाला वाटतं की, त्यांचा रूममेट हा चांगला असावा आणि त्याच्यासोबत चांगली बाँडिंग व्हावी. मात्र नेहमीच प्रत्येकाला चांगला वा चांगली रुममेट मिळत नाही. त्यामुळे एका व्यक्तीने आपल्या सोबत राहण्यासाठी रुममेटची जाहिरात काढली आहे.

व्यक्तीने रूममेटसाठी अनोखी मागणी ठेवली आहे. जी पाहून अनेकजणं हैराण झाले आहेत. सध्या या जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे. रस्त्याच्या किनाऱ्याला ही जाहिरात लावण्यात आली आहे. जाहिरातीत ४४ वर्षीय ओवन नावाची व्यक्तीने सोबत राहण्यासाठी रूममेटची वॅकेन्सी काढली आहे. यासह त्याने रूममेटसाठी अनेक मागण्या ठेवल्या आहेत.

व्यक्तीने जाहिरातीत लिहिलं आहे की, तो सिंगल आहे आणि १८ ते २५ वर्षांच्या महिला रुममेटच्या शोधात आहे. त्याने जाहिरातीत पुढे लिहिलं आहे की, तिच्या रूममेटला स्वयंपाक करावं लागेल आणि घराची साफसफाईही करावी लागेल. धक्कादायक म्हणजे घरात केवळ एकच बेडरूम आहे. महिला रूममेटला त्याच्यासोबत बेड शेअर करावा लागेल.

मात्र पुढे असंही लिहिलं आहे की, जोपर्यंत महिला त्याच्यासोबत बेड शेअर करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ती सोफ्यावर झोपू शकतो. त्याशिवाय ती मित्रांना घरी आणू शकत नाही. या अटी पाहून लोक हैराण झाले आहेत. भयंकर म्हणजे बाथरूमला जातानाही रुममेटला दार उघडं ठेवावं लागेल. ही जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं आहे.

Web Title: 44 year old man advertisement for female room mate with weird conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.