'या' व्यक्तीच्या पोटातून काढल्या तब्बल ४५२ मेटलच्या वस्तू, ऑपरेशनसाठी ४ डॉक्टरांना लागला ४ तास वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:26 PM2019-08-16T12:26:28+5:302019-08-16T12:31:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून काही लोकांच्या पोटातून ऑफरेशन करून विचित्र वस्तू बाहेर काढल्याच्या घटना समोर आल्यात.
गेल्या काही दिवसांपासून काही लोकांच्या पोटातून ऑफरेशन करून विचित्र वस्तू बाहेर काढल्याच्या घटना समोर आल्यात. अशीच आणखी एक घटना अहमदाबादमध्ये समोर आली आहे. इथे एक २८ वर्षीय व्यक्ती पोट दुखतं म्हणून डॉक्टरकडे गेली. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्स-रे काढला तेव्हा जे दिसलं ते पाहून डॉक्टर थक्क झालेत. त्यांना काही धातुंच्या वस्तू त्याच्या पोटात दिसल्या. त्यांनी जेव्हा रूग्णाचं ऑपरेशन केलं तेव्हा त्याच्या पोटातून तब्बल ४५२ मेटलचे तुकडे काढण्यात आलेत.
(Image Credit : www.indiatoday.in)
रूग्णाच्या पोटातून काढण्यात आलेल्या वस्तुंमध्ये नाणी, नेल कटर, सेफ्टी पिन, नट-बोल्ट इत्यादी अशा ४५२ वस्तू सर्जरी करून बाहेर काढण्यात आल्यात. या सर्व वस्तूंच मिळून साधारण ४ किलो वजन होतं. ही सर्जरी ४ डॉक्टरांनी मिळून केली. तर त्यांना रूग्णाच्या पोटातून या वस्तू काढण्यासाठी साधारण ४ तासांचा वेळ लागला.
(Image Credit : thehushpost.com)
डॉक्टरांनी सांगितले की, रूग्ण गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून या धातुच्या वस्तू खात होता. ही व्यक्ती मानसिक आजारी आहे. त्याला Schizophrenia नावाचा आजार आहे. डॉक्टरांनुसार, हा रूग्ण कुणाच्यातरी सांगण्यावरून धातुच्या या वस्तू खात होता. किंवा तो या वस्तुंना खाण्याचे पदार्थ समजू लागला असेल. सध्या रूग्णाची स्थिती चांगली आहे. त्याला डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.