परदेशात सेटल व्हायचंय? हे 4 देश बाहेरील लोकांना सेटल होण्यासाठी देतात पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 10:42 AM2018-05-26T10:42:19+5:302018-05-26T10:42:19+5:30
जगात असेही काही देश आहेत जे बाहेरील लोकांना तिथे सेटल होण्यासाठी स्वत:च पैसा देतात. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते देश....
जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील अनेक आश्चर्यजनक गोष्टी आपण वाचत-ऐकत असतो. काही देशांमध्ये तुम्ही फिरायला गेला असाल तर कितीतरी पैसा खर्च करावा लागला असेल. किंवा तुम्ही दुसऱ्या देशात सेटल होण्याचा विचार करत असाल तर सर्वातआधी पैशांचा विचार डोक्यात येत असेल. अशाच जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, जगात असेही काही देश आहेत जे बाहेरील लोकांना तिथे सेटल होण्यासाठी स्वत:च पैसा देतात. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते देश....
1) सस्केचेवान
कॅनडाजवळील हा सस्केचेवान देश या यादीत आहेत. इथे येणाऱ्या लोकांना सस्केचेवान सरकार आपल्याकडून वीस हजार डॉलर देतात. या देशात कुणीही राहण्यासाठी आलं तरी येथील सरकार त्यांना सेटल होण्यासाठी इतकी रक्कम देते. या मदतीतून कुणीही तिथे आपलं कामकाज किंवा बिझनेस सुरु करु शकतात.
2) पोनगा
स्पेनच्या या लहानशा गावाचाही या यादीत समावेश आहे. आपल्या सौंदर्यासाठी ओळखलं जाणारं हे गाव जगभरात प्रसिद्ध आहे. इथे येऊन राहणाऱ्या कपलला येथील सरकार काही सरकार काही पैशांची मदत करते. जेणेकरुन त्यांना तिथे सेटल होण्यास मदत व्हावी. काही लोकांचं हेही म्हणनं आहे की, या कपल्सना ही रक्कम "शगून" म्हणून दिली जाते.
3) अॅम्सटर्डम
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अॅम्सटर्डम येतो. इथे सेटल होण्यासाठी येणाऱ्या लोकांना येथील सरकार भारतीय रक्कमेनुसार 67 हजार रुपये देतात. त्यातून त्यांनी काहीतरी व्यवसाय सुरु करावा हा उद्देश असतो.
4) डेट्रॉइट
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेतील डेट्रॉइट हा सर्वात लहान देश आहे. या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे येथील सरकार इथे राहणाऱ्या लोकांना खास भत्ते देत आहे. इथे येऊन सेटल होणाऱ्या लोकांना इतर ठिकाणांपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं.
5) नायग्रा फॉल, यूएस
नायग्रा फॉल हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे. जगातल्या सर्वात सुंदर जागांमध्ये नायग्रा फॉलही आहे. या जागेच्या विकासासाठी येथील सरकारने एक योजना काढली आहे. त्यानुसार या वॉटरफॉलजवळ कमीत कमी दोन वर्ष काम करणाऱ्या यूनिव्हर्सिटी ग्रॅज्यूएट स्टुडंटला सरकार चार लाख रुपये देते.