५ वर्षाच्या चिमुरडीने केली कुकीज विकून १०० विद्यार्थांची मदत, कोण आहे ही मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 04:38 PM2019-12-21T16:38:03+5:302019-12-21T16:42:32+5:30
अमेरिकेच्या ५ वर्षाच्या मुलीने विद्यार्थांची मदत केली आहे. या मुलीचं नाव कैथलीन हार्डि असं आहे.
अमेरिकेतील ५ वर्षाच्या मुलीने विद्यार्थांची मदत केली आहे. या मुलीचं नाव कैथलीन हार्डि असं आहे. या मुलीने दुसऱ्या विद्यार्थांसाठी पैसे कमवण्याचा विचार केला आहे. जी मुलं शाळेतील दुपारच्या जेवणाचे पैसे भरू शकतं नाहीत. अशा मुलांसाठी ही मुलगी पैसे कमावत आहे. ज्या मुलांना दुपारच्या जेवणाचे पैसे घेण्यासाठी आपल्या घरच्यासोबत संघर्ष करावा लागतो. अश्या मुलांसाठी ही मुलगी प्रयत्न करत आहे. तसंच तिला एकूण १२३ गरजू मुलांची मदत करायची होती. पण १०० मुलांना मदत करू शकेल इतके पैसे तिच्याकडे जमा झाले आहेत.
कैथलीनची आई करिना हार्डी या असं सांगतात कि सुरूवातीला कैथलीन गरजू मुलांना मदत करण्यासाठी प्रश्न विचारायला आली .तेव्हा मी तिला असं सांगितले की जगात अशी खूप लोकं आहेत जी आपल्या गरजा पूर्ण करू शकता नाहीत. त्यानंतर कैथलीन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मला एक स्टॉल लावून कुकीज विकायच्या आहेत आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्या मुलांची मदत करायची आहे. अशा प्रकारे कैथलीनने ८ डिसेंबरला कुकीजचा स्टॉल लावला. त्यातून तिने ८० डॉलरर्स मिळवले.
ब्रीज हिल इलेमेंटरी स्कूलचे प्रिंसिपल लोरी हिगले या म्हणाल्या की ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. मुलांच्या दुपारच्या जेवणाचे पैसे देण्याचा विक्रम कैथलीनने केलेला आहे. तसंच करिना हार्डी या असं म्हणाल्या कि त्यांना या मोहिमेला पुढे घेऊन जायचं आहे. कैथलीन हार्डीने हा उपक्रम #KikisKindnessProject या नावाने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.