हा आहे 50 दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन

By admin | Published: April 24, 2017 10:11 PM2017-04-24T22:11:36+5:302017-04-24T22:15:53+5:30

मोबाईल मार्केटमध्ये असा फोन लॉंच करण्यात आला आहे, की तो एकदा चार्ज केला तर पुढील 50 दिवस पुन्हा चार्ज करण्याची गरज नाही.

This is a 50-day battery backup phone | हा आहे 50 दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन

हा आहे 50 दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - मोबाईल मार्केटमध्ये असा फोन लॉंच करण्यात आला आहे, की तो एकदा चार्ज केला तर पुढील 50 दिवस पुन्हा चार्ज करण्याची गरज नाही.
मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने गेल्या शुक्रवारी नवीन फीचर असलेला  सुमो टी 3000 हा फोन लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 
जिवी मोबाईलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, फीचर सुमो टी 3000 या फोनमध्ये शक्तीशाली बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला सतत हा फोन चार्ज करावा लागणार नाही. एकदा चार्ज केली की 50 दिवसांचा बॅकअप देतो. 
दरम्यान, सुमो टी 3000 या फोनची किंमत 1,490 रुपये रुपये इतकी असून याचा डिस्प्ले 2.8 इंचाचा आहे. तसेच, या फोनला कॅमेराही देण्यात आला आहे. याचबरोबर ऑटो कॉल रेकॉर्ड, मोबाईल ट्रॅकर, टच लाईट, जीपीएस या सुविधा सुद्धा देण्यात आल्या आहेत.

Web Title: This is a 50-day battery backup phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.