५० वर्षांत क्रिस यांनी प्रथमच पाहिले जग

By admin | Published: June 19, 2017 01:14 AM2017-06-19T01:14:17+5:302017-06-19T01:14:17+5:30

रंगांधळेपणा (कलर ब्लार्इंडनेस) हा गंभीर प्रश्न आहे. रंगाधळेपणा ५० वर्षांचे क्रिस स्मेलसर यांना होता. त्यांचे सगळे आयुष्य बेरंगच होते.

In 50 years, the first time Criss saw the world | ५० वर्षांत क्रिस यांनी प्रथमच पाहिले जग

५० वर्षांत क्रिस यांनी प्रथमच पाहिले जग

Next

रंगांधळेपणा (कलर ब्लार्इंडनेस) हा गंभीर प्रश्न आहे. रंगाधळेपणा ५० वर्षांचे क्रिस स्मेलसर यांना होता. त्यांचे सगळे आयुष्य बेरंगच होते. आता एक विशेष प्रकारचा चष्मा वापरून त्यांनी हे रंगीत जग पहिल्यांदा पाहिले. क्रिस यांना याआधी प्रत्येक वस्तू काळी व पांढरीच दिसायची. क्रिस यांनी हा चष्मा लावताच त्यांना सगळ््या वस्तू रंगीत दिसू लागल्या. आकाशापासून हिरवळीपर्यंत क्रिस यांना वस्तू ज्या मूळ स्वरुपात आहेत तशा दिसू लागल्या.
क्रिस यांना एनकोरोमा ग्लासेसमुळे सगळे स्वच्छ दिसू लागले. त्यांच्या ५० व्या वाढदिवशी मित्रांनी व कुटुंबियांनी मिळून त्यांना हा चष्मा भेट दिला. क्रिस यांनी या चष्म्याचा खास प्रकारचा डबा उघडताच त्यांना भावना आवरल्या नाहीत ते रडले. चष्मा डोळ््यांवर लावताच त्यांना त्यांच्या भावनांना आवरता आले नाही. या दरम्यान ते हसतही होते व रडतही. ते पळून मोकळ््या आकाशाखाली आले. हिरव्यागार झाडांना त्यांनी बघितले. आकाशाकडे बघून ते म्हणाले ओ, माय गॉड.

Web Title: In 50 years, the first time Criss saw the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.