हे आहे 5 हजार वर्ष जुनं पब रेस्टॉरन्ट, एका गुहेच्या आत सापडल्या या वस्तू...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:26 PM2023-02-16T13:26:13+5:302023-02-16T13:29:51+5:30
5000 Year Old Pub Restaurant : पेन्सिलवेनिया विश्वविद्यालय आणि पीसा विश्वविद्यालयाने सोबत मिळून एका प्रिमिटीव रिफ्रेजेरेशन सिस्टमच्या माध्यमातून अवशेष प्राप्त केले.
5000 Year Old Pub Restaurant : दक्षिण इराकमध्ये ऑर्केयोलॉजिस्टमध्ये इंटरेस्ट असलेल्या काही लोकांनी जवळपास 5 हजार वर्ष जुना एक दारूचा अड्डा शोधून काढला आहे. ज्याला आजकाल लोक पब किंवा बार म्हणतात. येथील अनेक अवशेष बाहेर काढण्यात आले आहेत. आता त्यांना आशा आहे की, यातून समोर येईल की, जगातल्या पहिल्या शहरांमध्ये लोकांचं जीवन कसं असायचं. यूएस-इटालियन टीमने आधुनिक शहर नसीरियाह (Nasiriyah) च्या उत्तर-पूर्वेला प्राचीन लगश (Lagash) ठिकाणांचा शोध लावला.
पेन्सिलवेनिया विश्वविद्यालय आणि पीसा विश्वविद्यालयाने सोबत मिळून एका प्रिमिटीव रिफ्रेजेरेशन सिस्टमच्या माध्यमातून अवशेष प्राप्त केले. जिथे जुन्या काळातील एक मोठं ओवन, जेवणासाठी टेबल आणि जवळपास 150 सर्विंग बाउलचा शोध लावला. कटोऱ्यांमध्ये मासे आणि प्राण्यांची हाडेही आढळून आली आहे. सोबतच बीअर पिण्याचे पुरावेही मिळाले आहेत.
प्रोजेक्ट डायरेक्टर हॉली पिटमॅन यांनी एएफपीला सांगितलं की, 'आमच्याकडे रेफ्रिजरेटर आहे. आमच्याकडे वाढण्यासाठी शेकडो भांडी आहेत. बेंच आहेत जिथे लोक बसत होते आणि रेफ्रिजरेटरच्या मागे एक ओवनही आहे ज्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी केला जात असावा. आम्ही याला एक मधुशाला म्हणजे बार म्हणतो. कारण सुमेरियो लोकांसाठी बीअर एक कॉमन ड्रिंक आहे. इतकंच काय तर पाण्यापेक्षाही जास्त महत्वाचं.
साइटवर काम करणारे इराकी आर्केलॉजिस्ट बेकर अजाब वली यांनी सांगितलं की, 'लगाश दक्षिण इराकच्या महत्वपूर्ण शहरांपैकी एक होतं. येथील लोक शेती, पशुपालन, मासे पकडणे यावर अवलंबून होते. पण मालाचीही आदान- प्रदान होत होती'.
प्रोजेक्ट डायरेक्टर पिटमॅन म्हणाले की, टीम त्या लोकांच्या व्यवसायांबाबत जाणून घेण्यास अधिक उत्सुक होती. ज्यांनी इतक्या आधी बार तयार केला होता. टीम सापडलेल्या वस्तू आणि ठिकाणांचं विश्लेषण करण्यात बिझी आहे.
ते म्हणाले की, 'असं बरंच काही आहे जे आम्हाला या शहराच्या सुरूवातीच्या काळाबाबत माहीत नाही आणि आम्ही तेच शोधत आहोत. आम्हाला आशा आहे की, आम्ही या मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचे शेजारी आणि व्यवसायाच्या प्रकारांबाबत अजून जाणून घेऊ'.