33 वर्षांपासून या व्यक्तीने कापल्या नाही मिशा, नीट करण्यासाठी लागतात ३ तास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:31 IST2018-10-01T16:30:09+5:302018-10-01T16:31:44+5:30
राजस्थानच्या बिकानेरमध्ये राहणारे गिरधर व्यास हे ५८ वर्षांचे आहेत. त्यांची चर्चा यासाठी होते कारण १९८५ मध्ये त्यांना लागलेला मिशा वाढवण्याचा नाद आजही कायम आहे.

33 वर्षांपासून या व्यक्तीने कापल्या नाही मिशा, नीट करण्यासाठी लागतात ३ तास
बिकानेर : राजस्थानच्या बिकानेरमध्ये राहणारे गिरधर व्यास हे ५८ वर्षांचे आहेत. त्यांची चर्चा यासाठी होते कारण १९८५ मध्ये त्यांना लागलेला मिशा वाढवण्याचा नाद आजही कायम आहे. गेल्या ३३ वर्षांत त्यांनी आपल्या मिशा कापल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे या मिशा नीट करण्यासाठी रोज त्यांनी ३ तासांचा वेळ लागतो.
गिरधर व्यास हे सरकारी नोकरी करतात. त्यांनी दावा केलाय की, त्यांनी मिशा वाढवण्यासाठी शॅम्प आणि साबणाचा कधीच वापर केला नाही. ते मिशांना मुलतानी माती लावतात. एका चॅनेलसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी सकाळी उठल्यावर सर्वातआधी माझ्या मिशा नीट करण्यासाठी बसतो. रोज मी त्यांना तेल लावतो आणि यासाठी मला रोज 2 तास वेळ लागतो'.
त्यानंतर गिरधर हे रोज सायंकाळी आपल्या मिशांना लिंबू आणि काळ्या मिऱ्यांच्या पावडरचा लेप लावतात. ते सांगतात की, याने त्यांची दाढी मुलायम होते. गिरधर यांच्या मिशा जवळपास २८ फूट लांब आहेत.
पण इतक्या मिशा वाढवणे आणि त्यांची काळजी घेणे हे फार कठीण काम असल्याचं ते स्वत: मान्य करतात. ते सांगतात की, 'यासाठी फार ध्येर्याची गरज लागते. अनेक लोक माझ्या दिनचर्येवर टिकाही करतात. पण मला याने फरक पडत नाही. मी जिथेही जातो लोक मला सेलिब्रिटी असल्यासारखी वागणूक देतात'.