ऐकावं ते नवलच! अवघ्या 6 वर्षांच्या चिमुरडीची स्वकमाई, खरेदी केलं 55 कोटींचं घर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 04:56 PM2019-07-27T16:56:52+5:302019-07-27T16:57:50+5:30
तुम्ही आतापर्यंत साठवलेल्या पैशातून काय विकत घेतलं आहे? ठिक आहे... हे सोडा हे सांगा की, महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमच्याकडे किती पैसे शिल्लक असतात? हा प्रश्न ऐकून शांत झाला असाल ना?
तुम्ही आतापर्यंत साठवलेल्या पैशातून काय विकत घेतलं आहे? ठिक आहे... हे सोडा हे सांगा की, महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमच्याकडे किती पैसे शिल्लक असतात? हा प्रश्न ऐकून शांत झाला असाल ना? महिन्याभराच्या खर्चातून हातामध्ये काय शिल्लक राहतं? आता तुम्हाला आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगतो. एक लहान मुलगी आहे. साधारणतः 6 वर्षांचीच आहे. हे वय तर खेळायचं असतं. या वयात मुलांना जास्त काही समजही नसते. परंतु या मुलीने एवढुशा वयात जे केलयं ना? ते ऐकून तुम्हाला खरचं धक्का बसेल. या चिमुकलीने स्वतः साठवलेल्या पैशातून एक घर विकत घेतलं आहे. घराती किंमत माहीत आहे? 55 कोटी रूपये.
दक्षिण कोरियामध्ये राहते ही चिमुकली
ऐकून धक्का बसला ना? या चिमुकलीचं नाव बोरम असून ती दक्षिण कोरियातील सियोलमध्ये राहते. बोरम यूट्यूबर आहे. सोशल मीडियावर चिमुकली फार प्रसिद्ध आहे. खासकरून लहान मुलांमध्ये बोरम फार प्रसिद्ध आहे कारण ती यूट्यूबवर खेळण्यांचे रिव्ह्यू करते.
सियोलमध्ये खरेदी केलं घर
बोरमने दक्षिण कोरियातील सियोलमध्ये घर खरेदी केलं आहे. 'जकार्ता पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, बोरमच्या कुटुंबातील सदस्यचं तिचं यूट्यूब चॅनेल हॅन्डल करतात. बोरम खेळण्यांचे रिव्ह्यू करते. तिच्या व्हिडीओमधूनचं तिला खूप पैसेदेखील मिळतात. या कुटुंबाने सियोलमधील गंगनम परिसरामध्ये 5 माळ्यांचं सुंदर घर खरेदी केलं असून त्याची किंमत 55 कोटी रूपये आहे.
रिपोर्टनुसार, बोरमचं हे घरं 2780.32 स्क्वेअर फुटांचं आहे. बोरम यूट्यूबच्या दोन चॅनल्सवर दिसून येते. यांपैकी एकाचं नाव Boram Tube ToysReview आणि Boram Tube Vlog अशी आहेत. ही दोन्ही चॅनल्स यूट्यूबवर कोरियातील सर्वात जास्त पैसे कमावणारे चॅनल्स आहेत.
असं सांगण्यात येत आहे की, या दोन्ही यूट्यूब चॅनल्समार्फत बोरमची प्रत्येक महिन्याला जवळपास 3.1 मिलियन डॉलर म्हणजेच, जवळपास 21 कोटी रूपये एवढी कमाई होते. यांमध्ये Boram Tube Vlog या यूट्यूब चॅनेल्सवर बोरमचे प्रत्येक दिवसाचे छोटे-छोटे व्हिडीओ शेअर केले जातात.