63व्या वर्षी मुलींसोबत बिकिनी शूट करून तिने लावली आग!
By admin | Published: February 7, 2017 03:06 PM2017-02-07T15:06:51+5:302017-02-07T15:33:36+5:30
बिकिनीवर हॉट पोझ देऊन प्रेक्षकांच्या मनात आग लावणाऱ्या बॉलिवृड आणि हॉलिवूडच्या अनेक तरुण अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असतील. पण
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 7 - बिकिनी सीन ही आजकालच्या चित्रपटामधील नित्याची बाब बनली आहे. बिकिनीवर हॉट पोझ देऊन प्रेक्षकांच्या मनात आग लावणाऱ्या बॉलिवृड आणि हॉलिवूडच्या अनेक तरुण अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असतील. पण एखाद्या मॉडेलने वयाच्या 63 व्या वर्षी स्वीमसुटवर हॉट फोटोशूट केल्याचे तुमच्या ऐकिवात नसेल. पण अँजेलिस ख्रिस्टिल ब्रिंकले, या 63 वर्षीय मॉडेलने आपल्या दोन मुली सेलियर (18) आणि अॅलेस्का (31) यांच्यासोबत असे फोटोशूट केले आहे. जे पाहून तुमच्या तोंडाचा आ वासल्याशिवाय राहणार नाही.
वयाच्या 63व्या वर्षी आपल्या शरीराची तंदुरुस्ती आणि सुडौल बांधा कायम राखणाऱ्या सुपर मॉडेल ब्रिंकले हिने स्पोर्ट्स इल्युस्ट्रेटेड या नियतकालिकासाठी हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये या मायलेकी बिकिनीमध्ये लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे 28 वर्षांपूर्वी बर्कले हिने याच नियतकालिकासाठी पहिल्यांदा बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते.
"फोटोशूट करताना जेव्हा माझ्या वयाचा विचार आला. तेव्हा एकवेळ मी थबकले. ते दिवस गेले असा विचार माझ्या मनात येऊन गेला, पण माझ्या मुलींसोबत जेव्हा प्रत्यक्षात शूटसाठी गेले, तेव्हा एकदा शूट करून पाहावे असा विचार केला आणि फोटोशूट केले," असे या फोटोशूटबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाली.