६३ वर्षीय आई आणि तिच्या ३६, ४० आणि ४१ वर्षीय मुलींचं सौंदर्य पाहून दुनिया थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 01:04 PM2018-08-11T13:04:03+5:302018-08-11T13:04:35+5:30

हजारों वर्षंपासून मनुष्य पृथ्वीवर अशी वनस्पती शोधतोय जी त्यांना नेहमीसाठी तरुण ठेवेल. तायवानच्या या सुंदर महिलांना पाहून यांना ती वनस्पती मिळाली असावी असंच वाटतं.

This 63-year-old mother looks younger than her daughters | ६३ वर्षीय आई आणि तिच्या ३६, ४० आणि ४१ वर्षीय मुलींचं सौंदर्य पाहून दुनिया थक्क!

६३ वर्षीय आई आणि तिच्या ३६, ४० आणि ४१ वर्षीय मुलींचं सौंदर्य पाहून दुनिया थक्क!

Next

मुंबई : हजारों वर्षंपासून मनुष्य पृथ्वीवर अशी वनस्पती शोधतोय जी त्यांना नेहमीसाठी तरुण ठेवेल. तायवानच्या या सुंदर महिलांना पाहून यांना ती वनस्पती मिळाली असावी असंच वाटतं. कारण वयाचा त्यांच्यांवर काही परिणाम दिसून येत नाही. कारण त्यांनी सांगितली तरी त्यांच्या वयावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

(दोघींच्या मधे मुलींची आई)

आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोत दोन तरुणींच्या मधे असलेली महिला त्यांची ६३ वर्षांची आई आहे. डावीकडे ४१ वर्षांची मुलगी लुरे हसु आणि उजवीकडे ३६ वर्षांची मुलगी शेरोन आहे. या वयातही त्यांच्या या सौंदर्याचं गुपित कोडं झालं आहे. 

(तीन बहिणी)

'द फॅमिली ऑफ फोजन एज'

काही दिवसांपूर्वीच ४१ वर्षीय इंटेरिअर डिझायनर आणि फॅशन ब्लॉगर लुरे हसु ही आपल्या लूक्स आणि वयामुळे जगभरातील मीडियात चर्चेचा विषय ठरली होती. पण आता तिच्या संबंधी आणखी एका रहस्यावरुन पडदा उठवला गेला आहे. 

लुरे हसुला दोन बहिणी असून त्यांची नावे शेरोन आणि फेफे आहेत. दोघींचं वय क्रमश: 36 आणि ४० आहे. या वयातही दोघीही कॉलेजला जाणाऱ्या तरुणी वाटतात. हे तर काहीच नाही...त्यांची आईचं वय सर्वात जास्त धक्का देणारं आहे. कारण त्यांच्या वयासोबत त्यांची सुंदरता मॅच करत नाही. त्यांची ६३ वर्षीय आई ही रिटायर्ड डान्सर आहे पण त्या अजूनही १६ वर्षांच्या दिसतात. 

काय आहे त्यांच्या तारुण्याचं गुपित?

तायवानच्या फ्रायदे मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत लुरे यांनी त्यांच्या तारुण्याचं गुपित सांगितले. लुरे सांगते की, नेहमी तरुण दिसण्यासाठी त्या हिरव्या भाज्या आणि जास्तीत जास्त पाणी पितात. शरीराला योग्यप्रमाणात पाणी मिळाल्याने शरीरावर सुरकुत्या दिसत नाहीत. 

लुरेची बहिण फेफे सुद्धा पाण्याच्या महत्वावर भर देते. ती सांगते की, ती सकाळी उठून कमीत कमी एक ग्लास कोमट पाणी पिते. मी गेल्या १० वर्षांपासून हेच करते आहे. मी दिवसाला ३५० ते ५०० मिली पाणी पिते. 
 

Web Title: This 63-year-old mother looks younger than her daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.