66 वर्षांचा अब्जाधीश पडला 34 वर्षीय महिलेच्या प्रेमात; 20 वर्षांचा संसार मोडून करणार दुसरं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 04:05 PM2022-10-28T16:05:37+5:302022-10-28T16:12:18+5:30
अमेरिकेचे जॉन पॉलसन 66 वर्षांचे असून फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 24 हजार कोटींच्या जवळपास आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ते जगातील 177 वा सर्वात श्रीमंत माणूस आहे.
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्याला वय, जात, धर्म, रंग या गोष्टी कधीच समोर दिसत नाही. सध्या अमेरिकेतील एक अब्जाधीश आपल्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. ते त्याच्यापेक्षा तब्बल 32 वर्षांनी लहान असलेल्या एका महिलेच्या प्रेमात पडले आहेत आणि आता तिच्याशी लग्न करण्याचा विचार करीत आहे. परंतु सध्या तलाकमध्ये अडकले आहेत. सध्या याच घटनेची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.
अमेरिकेचे जॉन पॉलसन 66 वर्षांचे असून फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 24 हजार कोटींच्या जवळपास आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ते जगातील 177 वा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची पत्नी जेनी पॉलसन 50 वर्षांची आहे आणि दोघांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. दोघांना दोन मुलीही आहेत. जेनीला तिच्या पतीच्या अफेअरची माहिती मीडियातून मिळाली आणि त्यानंतर दोघांच्या तलाकची प्रक्रिया सुरू झाली. आता जॉन यांना जेनीला मोठी रक्कम द्यावी लागेल.
34 वर्षीय महिला झाली गर्लफ्रेंड
रिपोर्ट्सनुसार, जॉनची 34 वर्षीय गर्लफ्रेंड एलिना डी एलमेडा एक फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे आणि ती 9 हजार रुपयांमध्ये डायट प्लॅन विकण्याचा व्यवसाय करते. प्रत्येकजण तिला पैशाची लोभी म्हणतो कारण ती पैशांसाठीच मोठ्या वयाच्या व्यक्तीसोबत असते. डेली स्टारच्या रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, जॉन यांना एलिनासोबत लग्न करून कुटुंब वाढवायचं आहे.
जॉन आणि एलिना न्यूयॉर्कला शिफ्ट झाले असून ते अनेकदा एकत्र दिसत आहेत. जॉन यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांचं मन खूप मोठं आहे आणि त्यांनी आपल्या पत्नीला मोठी रक्कम देऊन कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्याची ऑफर देखील दिली आहे, परंतु ती सहमत नाही. त्याचवेळी जॉन कोर्टाबाहेर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून जेनी सेटलमेंट करू इच्छित नाही, असं पत्नीच्या वकिलाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"