प्यार का बंधन! 67 वर्षांची रामकली 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात; लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी गेली कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:40 AM2023-02-14T10:40:19+5:302023-02-14T10:47:37+5:30
67 वर्षीय रामकली 39 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. लिव्ह-इन रिलेशनची प्रकरणे सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये दिसतात, परंतु ग्वाल्हेरमध्येही लिव्ह-इनचा ट्रेंड वाढत आहे.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं. अनेकदा वयाचा फरक प्रेमाच्य़ा आड येत नाही. अशाच एका अनोख्या प्रेमाची घटना आता समोर आली आहे. जिथे 67 वर्षीय रामकली 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात पडली आणि विशेष म्हणजे ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. एक वर्षापूर्वी, दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिपचे कागदपत्र देखील केले आहेत. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
67 वर्षीय रामकली 39 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. लिव्ह-इन रिलेशनची प्रकरणे सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये दिसतात, परंतु ग्वाल्हेरमध्येही लिव्ह-इनचा ट्रेंड वाढत आहे. चंबळमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपची एक अनोखी घटना समोर आली आहे, जिथे 67 वर्षीय रामकलीने 28 वर्षीय भोलूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपशी संबंधित कागदपत्रे नोटरी केली आहेत. मुरैना जिल्ह्यातील कैलारस येथे राहणारी 67 वर्षीय रामकली ही 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात पडली. दोघे प्रेमात आहेत पण लग्न करायचे नाही.
दोघांनी लिव्ह-इन रिलेशन निवडले, त्यामुळे रामकली आणि भोलू ग्वाल्हेरच्या जिल्हा न्यायालयात पोहोचले आणि दोघांनी लिव्ह-इन रिलेशन नोटरी केले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून एकत्र राहायचे आहे, दोघेही प्रौढ आहेत, लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहताना भविष्यात वाद होऊ नयेत, यासाठी नोटरी घेण्यासाठी आल्याचे रामकली आणि भोलू सांगतात.
ग्वाल्हेरचे वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितले की, आजकाल जेव्हा स्त्री-पुरुष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात, तेव्हा त्यांच्यात कधी-कधी मतभेद होतात. जेव्हा लिव्ह-इन जोडप्यांची जात वेगळी असते किंवा वयात फरक असतो, तेव्हा अशा लिव्ह-इन जोडप्यांमध्ये अधिक वाद होतात. त्याच वेळी, अनेक जोडप्यांमध्ये एकमेकांच्या नोकरीबद्दल अहंकाराचा संघर्ष सुरू होतो, नंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचते. यामुळेच वाद टाळण्यासाठी अशी जोडपी लिव्ह इन रिलेशनची नोटरी तयार करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"