झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 04:01 PM2020-08-01T16:01:35+5:302020-08-01T16:26:44+5:30

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या जगाच्या वेगवेगळ्या देशातील हायस्पीड ट्रेनबाबतची आश्चर्यकारक माहिती.

The 7 Fastest Trains in the World | झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात!

झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात!

Next

भारतात बुलेट ट्रेनची घोषणा होऊन आता बरेच महिने झाले आहेत. भारतात जरी पहिल्यांदाच बुलेट ट्रेन होणार असली तरी जगातल्या अनेक देशांमध्ये आधीच वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचं जाळ निर्माण झालं आहे. या बुलेट ट्रेन इतक्या वेगवान आहेत की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला विमाना इतकाच कमी वेळ या हायस्पीड ट्रेनने लागतो. अशात काही जगातल्या सर्वात वेगवान ट्रेनबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Image Credit : mobileworldlive.com)

Shanghai Maglev - या ट्रेनला शांघाय ट्रान्सरॅपिड नावानेही ओळखले जाते. ही चीनमधील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिकिटासाठी सुद्धा ही ट्रेन सर्वात महागडी मानली जाते. ही ट्रेन शांघायमधील पुडोंग इंटरनॅशनल एअरपोर्टपासून ते लॉंगयांग या मेट्रो स्टेशनपर्यंत केवळ १९ मैलाचा प्रवास करते. हा इतका प्रवास करण्यासाठी या ट्रेनला केवळ ७ मिनिटांचा कालावधी लागतो. ही ट्रेन हा ७ मिनिटांचा प्रवास मॅग्नेटिक लेव्हिटेशन ही टेक्नॉलॉजीवर करते. या ट्रेनचा स्पीड ४३० किमी प्रति तास इतका आहे.

Fuxing Hao CR400AF/BF - पहिल्या क्रमांकानंतर दुसऱ्या क्रमांकावरही चीनमधीलच ट्रेन आहे. CR400AF/BF या दोन्ही ट्रेन सुद्धा जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या ट्रेन आहेत. या ट्रेनचा टॉप स्पीड ४२० किमी प्रति तास इतका आहे. या दोन्ही ट्रेन पाच तासांच्या आत हजारो प्रवाशांना बीजिंग साऊथमधून शांघायच्या स्टेशनला पोहोचवतात.

Shinkansen H5 and E5 - जगातल्या सर्वात वेगवान धावणाऱ्या ट्रेनमध्ये नंबर लागतो हायस्पीड ट्रेन शिंकान्सेनचा. ही जपान रेल्वेकडून चालवली जाणारी सर्वात जास्त वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची टेक्नॉलॉजी आहे. ताशी २१० किमी या वेगाने धावणारी पहिली शिंकान्सेन - तोकाइदो शिंकान्सेन - १९६४ साली सुरू करण्यात आली होती. आता या ट्रेन ३०० किमी प्रति तास वेगाने धावतात.

The Italo and Frecciarossa - इटलीतील या दोन्ही ट्रेन सर्वात वेगवान ट्रेन मानल्या जातात. या ट्रेन प्रवाशांना Milan to Florence म्हणजेच रोममध्ये तीन तासांच्या आत नेतात. या ट्रेन यूरोपमधील सर्वात वेगवान ट्रेन आहेत. या ट्रेनचा स्पीड ३०० किमी प्रति तास इतका आहे.

Renfe AVE - पाचव्या क्रमांकावर आहे स्पेनमधील Velaro E. या ट्रेनचा समावेश जगातल्या सर्वात वेगवाग ट्रेनमध्ये होतो. लांब पल्ल्याच्या  प्रवासासाठी ही ट्रेन वापरली जाते. स्पेनमधील मुख्य शहरांना या ट्रेनने जोडलं गेलं आहे. या ट्रेनने बार्सिलोना ते पॅरिस हे अंतर केवळ सहा तासात पार केलं जातं. या सीरीजच्या वेगवेगळ्या ट्रेन स्पीड ४०३.७ किमी प्रति तास इतका आहे.

Haramain Western Railway - मक्का आणि मदीना या मुस्लिमांच्या धर्मस्थळादरम्यान हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनने लोक ४५० किलोमीटरचा प्रवास करतील आणि ट्रेन ३०० किमी प्रति तासाच्या स्पीडने धावेल. आधी या दोन ठिकाणांवर पोहोचण्यासाठी कारने अनेक तास लागत होते. आता केवळ २ तासात हा प्रवास होईल. ही हायस्पीड ट्रेन सेवा १६ अरब डॉलर खर्चून उभारण्यात आली आहे.

DeutscheBahn ICE - जर्मनीत धावणारी DeutscheBahn ICE ही ट्रेन जगातल्या सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक आहे. ही ट्रेन स्पेनमधील सर्वात वेगवान Siemens design ची ट्रेन आहे. DeutscheBahn ICE या सीरीजच्या इथे अनेक ट्रेन्स चालवल्या जातात. यातील काही देशाबाहेरही धावतात. या ट्रेन ३२० किमी प्रति तास वेगाने धावतात. देशभरात या २५९ ट्रेन्सचं जाळं आहे.

Web Title: The 7 Fastest Trains in the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.