हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 04:15 PM2021-03-01T16:15:35+5:302021-03-01T16:32:04+5:30
पैसे जमा करण्यासाठी तिने जी आयडिया काढली ती सुद्धा वेगळी आहे. लीजा तिची आई एलिजाबेथच्या बेकरी मध्येच काम करत आहे.
ही ७ वर्षांची मुलगी तिच्या आईच्याच बेकरीमध्ये लिंबू पाणी विकत आहे. ती हे का करते हे वाचून अनेकजण भावूक होतील. लीजा स्कॉट असं या मुलीचं नाव असून तिच्या मेंदूवर लवकरच सर्जरी होणार आहे. आपल्या सर्जरीसाठी ती स्वत: जमा करत आहे. जेणेकरून तिच्या आईवरील खर्चाचं ओझं थोडं कमी होईल.
पैसे जमा करण्यासाठी तिने जी आयडिया काढली ती सुद्धा वेगळी आहे. लीजा तिची आई एलिजाबेथच्या बेकरी मध्येच काम करत आहे. अमेरिकेच्या अलबामामध्ये Savage बेकरीमध्ये लिंबू पाणी स्टॉल लावला आहे. लोक जेवढं जास्त लिंबू पाणी घेतील तिला तेवढी जास्त मदत होईल. (हे पण वाचा : VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!)
Also, @idotvnews and I may have been a little sidetracked with just how cute Liza is. If I miss deadline, it’s because we were making a music videos 🤷🏼♀️ pic.twitter.com/rdqhbW45EZ
— Malique (@MaliqueRankin) February 25, 2021
लीजाच्या आईने आपल्या मुलीच्या आजाराबाबत सांगितले की, 'तिच्या मेंदूमध्ये तीन ठिकाणी समस्या आहे. त्यामुळे मेंदूचा उजवा भाग सतत असामान्य असतो. त्यामुळेच तिला झटके येतात'.
साधारण ६ महिन्यांपूर्वी लीजाला इतके भयंकर झटके आले होते की, ती बेशुद्ध झाली होती आणि तिच्या मांसपेशींमध्ये तणाव आला आहे. नंतर समोर आले की, तिमा मेंदू खासप्रकारचा आहे. या आजाराला सेरेब्रल मॅलफॉर्मेशन असं म्हणतात. सामान्यपणे कोणत्याही प्रकारच्या सेरेब्रल मॅलफॉर्मेशनमध्ये डॉक्टरांना साधारणपणे एकप्रकारचंच मॅलफॉर्मेशन दिसतं. पण लीजाच्या केसमध्ये त्यांना तीन ठिकाणी अडचण दिसली. (हे पण वाचा : जुळे भाऊ ऑपरेशन करून बनल्या बहिणी, आजोबांनी प्रॉपर्टी विकून सर्जरीसाठी दिले पैसे!)
लीजा लवकरच तिच्या पहिल्या सर्जरीसाठी बॉस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये जाईल. इतक्या अडचणी असूनही लीजाची हिंमत कायम आहे. ती स्ट्रॉंग आहे. ती सांगते की, ती या अडचणीवर मात करेल. तिच्या आईने तिला हिंमत दिली आहे. ती नेहमीच तिला साथ देते.
आपल्या मुलीसाठी एलिजाबेथने इन्शुरन्सचा कवर वाढवला आहे. पण ट्रॅव्हल आणि हॉटेलचा खर्च, सोबतच औषधांचा खर्च याचा अधिक भार पडतो. आशा आहे की, एलिजाबेथच्या मदतीसाठी लोक लवकरच समोर येतील. जेणेकरून तिच्या मुलीची सर्जरी व्हावी आणि ती तिचं बालपण हसत-खेळत जगू शकेल.