इथे अचानक दिसून आला रहस्यमय गोलाकार दगड, संशोधकही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 09:46 AM2022-09-28T09:46:37+5:302022-09-28T09:49:47+5:30
Prague : प्रागमध्ये स्टोनहेज आणि इजिप्तच्या पिरॅमिडहूनही जास्त जुना स्टोन राउंडेल म्हणजे मोठा गोलाकार दगड आढळून आला आहे.
जगभरात इतकी रहस्य आहेत ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल. अनेकदा इतक्या जुन्या गोष्टी समोर येतात की पुरातत्ववादी लोकही हैराण होतात. असंच काहीतरी चेक रिपब्लिकच्या प्रागमध्ये सापडलं. ज्यावर जगभरातील लोकांच्या नजरा आहेत. प्रागमध्ये (Prague) स्टोनहेज आणि इजिप्तच्या पिरॅमिडहूनही जास्त जुना स्टोन राउंडेल म्हणजे मोठा गोलाकार दगड आढळून आला आहे. दगडाच्या आजूबाजूला खोदकाम केल्यावर काही जुन्या वस्तूही सापडल्या आहेत.
पुरतत्ववाद्यांनी सांगितलं की, हा गोलाकार दगड स्टोन एज काळात साधारण 7 हजार वर्षाआधी तयार करण्यात आला असावा. पण हा का तयार केला गेला असावा याचं कारण अजून समजून शकलेलं नाही. चेक अकॅडमी सायन्सचे पुरातत्व विभागाचे जारोसलव रिद्की यांनी रेडिओ प्राग इंटरनॅशनलसोबत बोलताना सांगितलं की, हा राउंडेल यूरोपमधील आर्किटेक्चरचा सगळ्यात जुना पुरावा आहे.
खास बाब ही आहे की, या गोलाकार निओलिथिक स्ट्क्चरची रूंदी साधारण 180 फूट आहे. जी पीसाच्या मीनारपेक्षाही जास्त आहे. या तीन दरवाजे आहेत. 1980 मध्येच या भागात गॅस आणि पाण्याची लाइन टाकताना मजुरांना ऐतिहासिक राउंडेल आढळून आला होता. आता साधारण 40 वर्षानंतर याचा पूर्णपणे शोध लावण्यात आला आहे.
संशोधकांच्या टीमला लीड करणारे पुरातत्ववादी मिरोसलव कराउस यांनी सांगितलं की, स्टोन एज दरम्यानच राउंडल तयार करण्यात आला आहे. हे त्या काळातील आहे जेव्हा लोखंडाचा शोध लागला नव्हता. त्यांनी सांगितलं की, याचा एक आर्थिक आणि व्यापार केंद्रासारखा वापर करण्यात आला असेल.
ते म्हणाले की, चेक रिपब्लिकच्या बोहेमिया भागातही असे राउंडेल्स तयार करण्यात आले होते. या लोकांचे असेच साधारण 200 उदाहरणे सेंट्ल ते इस्टर्न यूरोपमध्येही बघता येतात. गेल्या काही वर्षात ड्रोनच्या मदतीने काढण्यात आलेल्या फोटोतून राउंडेलची ओळख पटवण्यात मदत मिळाली.