नोकरी गेली, म्हणून आजोबांनी सुरू केलं यु-ट्यूब चॅनेल; अन् महिन्याभरात केली कमाल....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:08 AM2020-06-18T11:08:00+5:302020-06-18T11:21:09+5:30
जवळपास तीन आठवड्यात हे आजोबा यु-ट्यूब स्टार बनले आहेत. हे आजोबा एका किराणामालाच्या दुकानात काम करत होते.
आजकाल यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अनेकजण प्रसिध्द होतात. आपली कला लोकांसमोर मांडू शकतात. लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने या आजोबांनी एक शक्कल लढवली आहे. हे ७९ वर्षीय आजोबा मॅक्सिकोचे रहिवासी आहेत. या आजोबांचे नाव कार्सिलोज एलिजोंडो आहे. जवळपास तीन आठवड्यात हे आजोबा यु-ट्यूब स्टार बनले आहेत. हे आजोबा एका किराणामालाच्या दुकानात काम करत होते.
कोरोनाकाळात या आजोबांची ७ वर्ष जूनी नोकरी सुद्धा गेली. २५ मे ला आजोबांनी टिटू चारली नावाने युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. या युट्यूबस चॅनेलवर हे आजोबा जेवण बनवण्याचे वेगवेगळे व्हिडीओ टाकत होते.
या आजोबांची जेवण बनवण्याची स्टाईल लोकांना खूप आवडली. लोकांनी या आजोबांच्या चॅनेलला इतकी पसंती दिली की, त्यांना तीन आठवड्यात ३ लाख ९३ हजार सब्सक्रायबर्स मिळाले. विषेश म्हणजे या आजोबांनी आत्तापर्यंत फक्त आठ व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
रिपोर्टनुसार या आजोबांची लहान मुलगी वेरोनिका यांना कामात खूप मदत करते. स्थानिक माध्यमांशी बोलताना आजोबांनी सांगितले की, ''मला नेहमी सकारात्मक राहायला आवडतं. मला सतत पुढे जायचं असून अशक्य असे काहीही नाही. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता फक्त आपल्याला माहित असालया हवा. '' या आजोबांचे सगळेच व्हिडीओ स्पॅनिश भाषेत असतात. या आजोबांना सहा नातवंडं आहेत. आजोबांच्या व्हिडीओला लाखो व्हिव्हज आणि शेकडो लाईक्स मिळतात. तुम्ही सुद्धा या व्हिडीओमध्ये आजोबांची जेवण बनवण्याची स्टाईल बघू शकता.
बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड
बोंबला! 'इथे' लग्नात जावयाला हुंडा म्हणून दिले जातात 21 विषारी साप, त्याशिवाय होतंच नाही लग्न!