कॉम्प्युटर गेम खेळून केली छप्परफाड कमाई, ८ वर्षाचा मुलगा झाला २४ लाख रूपयांचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 10:27 AM2021-03-04T10:27:20+5:302021-03-04T10:33:00+5:30

कॉम्प्युटर गेममधून एका मुलाने २४ लाख रूपयांची कमाई केली आहे. केवळ ८ वर्षाच्या मुलाने गेम खेळून २४ लाख रूपये कमावले आहेत.

8 year boy youngest pro fortnite player in world get 24 lakh contract | कॉम्प्युटर गेम खेळून केली छप्परफाड कमाई, ८ वर्षाचा मुलगा झाला २४ लाख रूपयांचा मालक

कॉम्प्युटर गेम खेळून केली छप्परफाड कमाई, ८ वर्षाचा मुलगा झाला २४ लाख रूपयांचा मालक

Next

लहान मुलं पूर्वी मैदानात जाऊन इतर मुलांसोबत खेळणं अधिक पसंत करायचे. पण आता मुलं मोबाइलवर आणि कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात जास्त रमतात. ते जास्तीत जास्त वेळ व्हिडीओ गेम खेळण्यात घालवतात. आता याच कॉम्प्युटर गेममधून एका मुलाने २४ लाख रूपयांची कमाई केली आहे. केवळ ८ वर्षाच्या मुलाने गेम खेळून २४ लाख रूपये कमावले आहेत.

या मुलाचं नाव जोसेफ डीन असून तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहतो. हा मुलगा Fortnite Game खेळणारा जगातला सर्वात कमी वयाचा मुलगा आहे. या गेममधील त्याची लेव्हल बघता कंपनीने त्याला एक हाय स्पीड कॉम्प्युटर आणि २४ लाख रूपये सायनिंग बोनस दिलं आहे.

जोसेफच्या आई-वडिलांनुसार, त्यांचा मुलगा चार वर्षांचा असतानापासून हा गेम खेळत आहे. हेच कारण आहे की, या गेममध्ये तो तरबेज झाला आहे. त्यामुळे तो एक वरच्या लेव्हलचा प्लेअर झाला आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, जोसेफच्या आई-वडिलांना त्याच्या गेम खेळण्याबाबत काहीच अडचण नाही. जोसेफची आई म्हणाली की, हा गेम थोडा हिंसक आहे. पण मला नाही वाटत यात काही गैर आहे. त्या म्हणाल्या की, त्यांचा मुलगा शाळेतून आल्यावर दोन तास गेम खेळत आणि वीकेंडला जास्त खेळतो. त्या म्हणाल्या की, तो नेहमी विचारूनच गेम खेळतो.

जोसेफच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलाला मोठं होऊन मोठा गेमर व्हायचं आहे. कारण त्याचा यातच जास्त इंटरेस्ट आहे. त्यांच्या मुलाने कमावलेल्या पैशांबाबत विचारले तर  त्यांनी सांगितले की, ते पैसे त्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तो ते भविष्यात खर्च करू शकेल.
 

Web Title: 8 year boy youngest pro fortnite player in world get 24 lakh contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.