वय वर्ष ८ अन् कमाई १८४ कोटी... कसे ते वाचून बंद होईल बोलती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:30 PM2019-12-20T12:30:23+5:302019-12-20T12:51:39+5:30

सामान्यपणे श्रीमंत होण्याची किंवा खूपसारा पैसा कमावण्याची इच्छा अनेकांची असते. पण खूप पैसे कमावण्यासाठी किती मेहनच करावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे.

This 8 year old children Ryan Kazi became the highest paid earning 184 crores | वय वर्ष ८ अन् कमाई १८४ कोटी... कसे ते वाचून बंद होईल बोलती!

वय वर्ष ८ अन् कमाई १८४ कोटी... कसे ते वाचून बंद होईल बोलती!

Next

सामान्यपणे श्रीमंत होण्याची किंवा खूपसारा पैसा कमावण्याची इच्छा अनेकांची असते. पण खूप पैसे कमावण्यासाठी किती मेहनच करावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. अशात एका लहान मुलाने एका वर्षात तब्बल १८४ कोटी रूपये कमावले. खेळणी पाहिली की, लहान मुलांची स्थिती काय होते हे अनेक पालकांना चांगलंच माहीत असेल. इतकंच काय तर मुलांनी खेळणी घेऊन मागितली की, पालकही त्यांना खेळणी घेऊ नये म्हणून नको नको ती कारणे देत असतात. पण जगात हा असा लहान मुलगा आहे. ज्याचे आई-वडील त्याला रोज नवनवीन खेळणी आणून देत असतील. 

२०१९ मध्ये त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून २६ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय करन्सीनुसार १८४ कोटी रूपये कमाई केली. फोर्ब्सने नुकतीच यादी जाहीर केली असून रेयानला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणारा व्यक्ती म्हणून जागा देण्यात आली आहे.

रेयान गौन असं या मुलाचं नाव आहे. हा अमेरिकेत राहणारा असून त्याच्या यू्टूयब चॅनेलचं नाव 'रेयान्स वर्ल्ड' असं आहे. त्याने हे चॅनेल २०१५ मध्ये सुरू केलं होतं. तेव्हा त्यांचं वय केवळ ३ वर्षे इतकं होतं.

रेयानेच्या यूट्यूब चॅनेलला तब्बल २२ मिलियनपेक्षा जास्त सब्सक्रायबर आहेत. रेयान हा यावर वेगवेगळ्या खेळण्यांचे रिव्ह्यू करतो. तसेच या खेळण्यांसोबतचे छोटे छोटे व्हिडीओही शेअर करतो. रेयानच्या एका व्हिडीओला एक बिलियन व्ह्यू मिळाले आहेत.


Web Title: This 8 year old children Ryan Kazi became the highest paid earning 184 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.