घरच्यांचा विरोध असूनही २३ वर्षाच्या तरूणीचं ८० वयाच्या व्यक्तीसोबत लग्न, वाचा लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:48 PM2024-06-13T15:48:19+5:302024-06-13T15:50:11+5:30

एका वृद्धाश्रमात काम करणारी तरूणी तिथेच राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नही केलं.

80 year old man marries 23 year old woman in chinaa | घरच्यांचा विरोध असूनही २३ वर्षाच्या तरूणीचं ८० वयाच्या व्यक्तीसोबत लग्न, वाचा लव्हस्टोरी

घरच्यांचा विरोध असूनही २३ वर्षाच्या तरूणीचं ८० वयाच्या व्यक्तीसोबत लग्न, वाचा लव्हस्टोरी

प्रेमात पडलेल्या लोकांना ना जात, ना धर्म, ना वय, ना पैसा काहीच दिसत नसतं असं म्हणतात. अशा अनेक प्रेम कहाण्या नेहमीच समोर येत असतात. ज्या बघून हैराण व्हायला होतं. अशीच एक प्रेम कहाणी सध्या चीनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 

ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटनुसार, चीनच्या एका वृद्धाश्रमात काम करणारी तरूणी तिथेच राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नही केलं. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. ज्यात दोघेही रोमॅंटिक पोज देताना दिसत आहेत. 

वृद्धाश्रमात भेट आणि मग लग्न

रिपोर्टनुसार, वृद्धाश्रमात काम करणाऱ्या तरूणीचं वय २३ आहे. तिची इथेच राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धासोबत भेट झाली. दोघांची मैत्री झाली त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. तरूणीला या व्यक्तीची बुद्धीमत्ता आणि त्याचं परिपक्व वागणं आवडलं. तर व्यक्तीला तरूणीतील दयाळुपणा आवडला.

घरच्यांचा विरोध तरी केलं लग्न

आपल्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी तरूणीच्या परिवाराचा विरोध होता. पण तरूणीने त्यांच्या विरोधाला धुडकावलं आणि वृद्ध व्यक्तीसोबत लग्न केलं. त्यांचं लग्नही मोठं झालं. पण तिचा परिवार लग्नात नव्हता.

दोघांचीही नावं जाहीर करण्यात आली नाहीत. पण दोघांची चर्चा चीनच्या सोशल मीडियावर रंगली आहे. लोक त्यांच्या वयाच्या अंतरावर भाष्य करत आहेत. तर काही लोकांनी दोघांना सपोर्ट केलं तर काहींनी टिका केली.

Web Title: 80 year old man marries 23 year old woman in chinaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.