'या' बेटावर सापडला ८ हजार वर्ष जुना मोती, जगातला सर्वात जुना मोती असल्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 11:40 AM2019-10-22T11:40:12+5:302019-10-22T11:48:03+5:30

कधीकधी नकळत अशी काही वस्तू आपल्या हाती लागले, जी पाहून सगळेच हैराण होतात. अशीच एक अनपेक्षित घटना संयुक्त अरब अमीरातीच्या अबुधाबीमध्ये घडली आहे.

8000 year old pearl found at Marawah Island Abu Dhabi, This is worlds oldest pearl | 'या' बेटावर सापडला ८ हजार वर्ष जुना मोती, जगातला सर्वात जुना मोती असल्याचा दावा!

'या' बेटावर सापडला ८ हजार वर्ष जुना मोती, जगातला सर्वात जुना मोती असल्याचा दावा!

Next

कधीकधी नकळत अशी काही वस्तू आपल्या हाती लागले, जी पाहून सगळेच हैराण होतात. अशीच एक अनपेक्षित घटना संयुक्त अरब अमीरातीच्या अबुधाबीमध्ये घडली आहे. इथे खोदकामादरम्यान पुरातत्ववाद्यांना ८ हजार वर्ष जुना एक मोती सापडला आहे. असा दावा केला जातोय की, हा जगातला सर्वात जुना मोती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मोती मारवाह बेटावर खोदकाम करताना सापडला. या मोत्याची किंमत किती आहे, याचा खुलासा अजून करण्यात आला नाही. ३० ऑक्टोबरला हा मोती अबुधाबीमध्ये प्रदर्शनात ठेवला जाणार आहे.

(Image Credit : Social Media)

तज्ज्ञांनुसार, प्राचीन काळात मोत्यांचा व्यवसाय चांगलाच मोठा होता. त्यावेळी मोसोपोटामियासोबत(प्राचीन इराक) मोत्यांचा व्यापार केला जात होता.

(Image Credit : Social Media)

प्राचीन काळातील लोक मोत्यांचा वापर दागिन्यांमध्ये करत होते. तज्ज्ञांनुसार, १६व्या शतकात अबुधाबीच्या किनाऱ्यांवर मोती आढळत होते. याचा उल्लेख त्या काळातील उद्योगपती राहिलेले गासपारो बाल्बी यांनीही केला होता.

(Image Credit ; Facebook/Department of Culture and Tourism Abu Dhabi)

एक वेळ होती जेव्हा संयुक्त अरब अमीरातची अर्थव्यवस्था मोत्यांच्या व्यवसायावर टिकून होती. पण १९३० मध्ये जपानी संस्कृतीतील मोत्यांच्या आगमनामुळे येथील मोत्यांचा व्यापार पूर्णपणे बंद झाला.


Web Title: 8000 year old pearl found at Marawah Island Abu Dhabi, This is worlds oldest pearl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.