9 हजार कोटीचं जहाज बनवणार ही कंपनी, 5 हजार लोकांची राहण्याची असेल व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:02 AM2024-01-12T11:02:28+5:302024-01-12T11:03:43+5:30
एक कंपनी एका अनोखं यॉट डिझाइन करत आहे. ज्याचा लूक एका शार्कसारखा असेल. याची किंमत वाचून सगळेच हैराण होतील.
कार असो बाइक वाहनांचे डिझाइन प्राण्यांच्या आकाराची नक्कल करूनच बनवले जातात. विमानाबाबतही तेच सांगता येईल. विमानाचं डिझाइन एखाद्या उडत्या पक्ष्यासारखं दिसतं. आता एका समुद्री जहाजाबातही असंच होणार आहे. एक कंपनी एका अनोखं यॉट डिझाइन करत आहे. ज्याचा लूक एका शार्कसारखा असेल. याची किंमत वाचून सगळेच हैराण होतील.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, इटालियन डिझाइन स्टूडियो Lazzarini ने एक यॉटचं डिजाइन तयार केलं. हे जर तयार झालं तर फार महागडं आणि फार आधुनिक असेल. हे जहाज 1056 फूट लांब असेल ज्याचं नाव ‘आउटरेजियस’ असेल. आणि हे तयार कऱण्यासाठी £860 million म्हणजे 9 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. यात स्वीमिंग पूल आणि हेलिपॅडही असेल.
5 हजार लोक राहू शकतील
रिपोर्टनुसार या यॉटमध्ये 5 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था असेल. हे इतकं मोठं असेल की, प्रवाशांना फिरण्यासाठी गोल्फ कोर्सवर असणाऱ्या छोट्या गाडीचा वापर करावा लागेल. महत्वाची बाब म्हणजे हे जहाज कमर्शियल वापरासाठी नसेल तर लोकांना विकण्यासाठी असेल.
अनोख्या डिझाइनसाठी फेमस आहे कंपनी
सध्या या जहाजाचं केवळ डिझाइन तयार झालं आहे आणि लॅजरिनीच्या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही कंपनी आपल्या अनोख्या डिझाइनसाठी नेहमीच चर्चेत असते. याआधीही त्यांनी वेगळ्या डिझाइनचे यॉट बनवले आहेत.