अनोखी भूतदया! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी 9 वर्षांचा मुलगा विकतो पेंटिग्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 05:12 PM2019-10-20T17:12:57+5:302019-10-20T17:32:42+5:30
रूसमध्ये राहणाऱ्या Pavel Abramov चं वय अवघं 9 वर्ष. परंतु या चिमुरड्याचं काम ऐकलं तर हैराण व्हाल. हा चिमुरडा आर्टिस्ट असून Arzamas मध्ये राहतो.
रूसमध्ये राहणाऱ्या Pavel Abramov चं वय अवघं 9 वर्ष. परंतु या चिमुरड्याचं काम ऐकलं तर हैराण व्हाल. हा चिमुरडा आर्टिस्ट असून Arzamas मध्ये राहतो. हा चिमुरडा पाळीव प्राण्याची चित्र काढतो आणि ती विकून पैसे कमावतो. आता तुम्ही म्हणाल यामध्ये हैराण होण्यासारखं काय आहे? यातून मिळालेले पैसे तो खेळणी खरेदी करण्यासाठी नाही किंवा मोबाईल विकत घेण्यासाठीही नाही, तर भटक्या कुत्र्यांना जेवण देण्यासाठी वापरतो.
आईची मदत घेऊन सुरू केलं होतं प्रोजक्ट
त्याने आपली आई Ekaterina Bolshakova च्या मदतीने साधारण एक वर्षापूर्वी हे प्रोजेक्ट सुरू केलं. याला त्यांनी Kind Paintbrush असं नावही दिलं आहे. ही आयडिया पावेल याचीच आहे. त्यासाठी त्याने स्वतः चित्र काढून विकण्याचा निर्णय घेतला.
चित्र काढताना डिल देखील करतात
पावेल पेंटिंग काढताना Pet Owner सोबत डिलदेखील करतात. माहितीसाठी सांगतो की, तो फक्त पाळीव प्राण्यांचीच चित्र काढतो.
एक मिशन म्हणून करतो काम
सध्या पावेल कडून पेटिंग काढून घेण्यासाठी अनेक लोक दूरवरून त्याच्याकडे येत असतात. एवढचं नाहीतर जर्मनी आणि स्पेनमधील लोकांनीही त्यांच्याकडून पेटिंग्स काढून घेतले आहेत.
100 कुत्र्यांना देतो जेवण
Arzamas मधील ज्या अॅनिमल शेल्टरमध्ये पावेल जातो. तिथे जवळपास 100 पेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत. तो त्यांना जेवण देतो आणि त्यांच्यासोबत वेळही घालवतो.
काही लोक औषधंही देतात
काही लोक पेवालकडून आपल्या पाळीव प्राण्यांची चित्र काढून घेतात आणि त्याबदल्यात त्याला प्राण्यांसाठी औषधं देतात.
आईला आहे गर्व
पेवालची आी सांगते की, मला माझ्या मुलाचा गर्व वाटतो. त्या म्हणतात की, 'तो संपूर्ण दिवस बीझी असतो. त्याचा एक-एक मिनिट मोलाचा आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान आहे.