रूपकुंड सरोवर परिसरात नवव्या शतकातील सांगाडे?

By admin | Published: January 4, 2017 02:24 AM2017-01-04T02:24:27+5:302017-01-04T02:24:27+5:30

उत्तराखंडमधील रुपकुंड सरोवर. समुद्रसपाटीपासून ५०२९ मीटर याची उंची आहे. मानवी सांगाड्यांचे सरोवर म्हणूनही ते ओळखले जाते. एका ब्रिटीश सैनिकाने १९४२ मध्ये याचा शोध

9th Century Shape in Roopkund Lake area? | रूपकुंड सरोवर परिसरात नवव्या शतकातील सांगाडे?

रूपकुंड सरोवर परिसरात नवव्या शतकातील सांगाडे?

Next

रुपकुंड : उत्तराखंडमधील रुपकुंड सरोवर. समुद्रसपाटीपासून ५०२९ मीटर याची उंची आहे. मानवी सांगाड्यांचे सरोवर म्हणूनही ते ओळखले जाते. एका ब्रिटीश सैनिकाने १९४२ मध्ये याचा शोध लावल्याचे सांगितले जाते. येथे नवव्या शतकातील सांगाडे सापडल्याचा दावाही शास्त्रज्ञांकडून केला जातो. हे आदीवासींचे सांगाडे असून, गारपीटीमुळे २०० हून अधिक आदिवासींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या सांगांड्यांबाबत अनेक दावे - प्रतिदावे करण्यात येतात. या सांगाड्यांबाबत असाही दावा केला जातो की, ट्रेकर्सचा एक समूह येथे आला होता. पण, प्रचंड पावसामुळे हे सर्वजण येथे अडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हाडांचे एक्स - रे आणि अन्य चाचण्यात असे दिसून आले की, हाडांमध्ये तडे गेले होते. हिमालयातील या परिसरात १८४१ च्या युद्धाच्या काळात सैनिकांचा एक समूूह येथून जात होता. काश्मीरचे जनरल झोरावार सिंग आणि त्यांचा मुलगा त्यावेळी याच परिसरात बेपत्ता झाले आणि येथेच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: 9th Century Shape in Roopkund Lake area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.