बाबो! त्याच्यावाचून करमेना, ५७ वर्षीय महिलेने लाखोंची फी देऊन शोधला बॉयफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:55 AM2022-12-12T10:55:32+5:302022-12-12T10:56:21+5:30

तीन मुलांची आई असलेल्या इसाबेला यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत; पण लग्न मोडल्यानंतर त्यांना एकाकी वाटू लागले.

A 57-year-old woman found a boyfriend by paying a fee of lakhs | बाबो! त्याच्यावाचून करमेना, ५७ वर्षीय महिलेने लाखोंची फी देऊन शोधला बॉयफ्रेंड

बाबो! त्याच्यावाचून करमेना, ५७ वर्षीय महिलेने लाखोंची फी देऊन शोधला बॉयफ्रेंड

Next

लंडन : प्रेमाला वयाचे बंधन नसते याचे नवे उदाहरण समोर आले आहे. ५७ वर्षे वयाच्या एका महिलेने चक्क लाखो रुपये मोजून प्रियकर मिळविला आहे. त्यासाठी तिने एकाला कंत्राटही दिले होते.

इसाबेला एरपिनो या एक लक्झरी प्रॉपर्टी डेव्हलपर आहे. त्या लंडनमधल्या इस्ट कोट येथे राहतात. तीन मुलांची आई असलेल्या इसाबेला यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत; पण लग्न मोडल्यानंतर त्यांना एकाकी वाटू लागले. त्यांनी कशीबशी चार वर्ष एकाकी काढली. त्यानंतर त्यांनी डेटिंग ॲपवर स्वतःसाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला; पण जास्त वयामुळे तिला जोडीदार सापडला नाही. तीने जोडीदार शोधण्याची जबाबदारी जेक नावाच्या व्यक्तीवर सोपविली, त्यासाठी तिने दोन लाख रुपयांची फीदेखील दिली.

अखेर प्रियकर सापडला
आजी असलेल्या इसाबेला यांच्यासाठी प्रियकर शोधणे जेक यांच्यासाठी मोठे आव्हान होते; मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना इसाबेला यांच्यासाठी बॉयफ्रेंड सापडला. जेकने इसाबेलाची ओळख इयान नावाच्या पोस्टमनसोबत करून दिली. दोघेही एकमेकांना फार आवडले. आता इसाबेला इयानचं सतत कौतुक करीत असते. हे कपल आता एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करीत आहे.

Web Title: A 57-year-old woman found a boyfriend by paying a fee of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.