गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली...; रिक्षा चालकाशी लग्न करायला 'फॉरेनची मुलगी' भारतात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 03:58 PM2022-11-26T15:58:50+5:302022-11-26T16:00:55+5:30
मायदेशी परतल्यानंतर कॅमिली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूच्या संपर्कात राहिली आणि त्यांच्याशी सतत बोलत होती.
हंपी - कर्नाटकातील अनंतराजू आणि बेल्जियममधील कॅमिली यांची कहाणी सध्या चर्चेत आहे. दोघांनी शुक्रवारी २५ नोव्हेंबरला हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. ३० वर्षीय अनंतराजू रिक्षाचालक असून तो टुरिस्ट गाईड म्हणूनही काम करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूची ओळख २७ वर्षीय कॅमिलीची झाली त्यानंतर हळूहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतराजू याची कॅमिलीसोबत पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा कॅमिली तिच्या कुटुंबासह हंपीला फिरायला आली होती. त्यावेळी अनंतराजू यांनी त्यांना गाईड केले. सोबतच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कॅमिली आणि कुटुंब भारत भेटीदरम्यान, अनंतराजू यांच्या प्रामाणिकपणाने आणि आदरातिथ्याने हे खूप प्रभावित झाले.
अशा परिस्थितीत, मायदेशी परतल्यानंतर कॅमिली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूच्या संपर्कात राहिली आणि त्यांच्याशी सतत बोलत होती. काही महिने बोलल्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. पण कोरोना महामारीमुळे त्याची भेट होऊ शकली नाही. मात्र, काही महिन्यांनी दोघांनी आपापल्या कुटुंबियांना त्यांच्या 'लाँग डिस्टन्स लव्ह'बद्दल सांगितले त्याला दोन्ही कुटुंबीयांचा कोणताही आक्षेप नव्हता. त्यांनी या जोडप्याला लग्नाला होकार दिला. अखेर शुक्रवारी दोघांचा विवाह झाला.
'पुन्हा येण्याचं दिलं होतं वचन'
अनंतराजूनं सांगितले की, कॅमिली २०१९ मध्ये तिच्या आई-वडील आणि भावंडांसोबत हंपीला आली होती. हंपीला ते पहिल्यांदाच आले असल्याने त्यांना इथल्या राहण्याची आणि जेवणाची काळजी वाटत होती. पण मी त्यांना राहण्यासाठी सर्वोत्तम हॉटेल मिळेल याची काळजी घेतली. कुटुंब माझ्या व्यवस्थेवर खूश झाले आणि त्यांनी मला वचन दिले की ते पुन्हा हंपीला भेट देतील. त्यात माझं आणि कॅमिलीचे सोशल मीडिया आणि फोनवरून बोलणे सुरू झाले.
'प्रेमाला सीमा नसते'
आम्ही काही दिवसांतच एकमेकांच्या प्रेमात पडलो. गेल्या वर्षीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण कोरोनामुळे ते लांबले. मात्र, आता आमचे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार झाले. लग्नासाठी कॅमिलीचे जवळपास ४० नातेवाईक आणि मित्र हंपी येथे आले होते. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप छान क्षण होता. प्रेमाला सीमा नसतात हे माझ्या लग्नाने सिद्ध केलं. दुसरीकडे बेल्जियमहून परत येऊन अनंतराजू यांच्याशी लग्न करणे ही खूप छान स्वप्न असल्याचे कॅमिलीचे म्हणणं आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते असं कॅमिली म्हणाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"