500 वर्षानी या देशातील सगळ्यांचे सरनेम होतील एकसारखे, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 03:30 PM2024-04-09T15:30:59+5:302024-04-09T15:31:41+5:30

एका शोधातून समोर आलं आहे की, सगळ्या लोकांचे सरनेम एकसारखे होणारे देश म्हणजे जपान आहे.

A country where everyone's surname will become the same after 500 years | 500 वर्षानी या देशातील सगळ्यांचे सरनेम होतील एकसारखे, जाणून घ्या कारण...

500 वर्षानी या देशातील सगळ्यांचे सरनेम होतील एकसारखे, जाणून घ्या कारण...

भारतात वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. लोकांचे सरनेमही वेगवेगळे असतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे पुढील 500 वर्षात सगळ्या लोकांचे सरनेम एकसारखे होतील.

एका शोधातून समोर आलं आहे की, सगळ्या लोकांचे सरनेम एकसारखे होणारे देश म्हणजे जपान आहे. असा दावा करण्यात आला आहे की, 500 वर्षानी इथे राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचे सरनेम एकसारखेच होतील. 

जपानबाबत करण्यात आलेल्या एका शोधानुसार, 500 वर्षानी म्हणजे 2531 मध्ये सगळ्या जपानी लोकांचे सरनेम एकसारखे होतील.

जपानच्या तोहोकू यूनिवर्सिटीच्या अर्थशास्त्राचे प्रोफेसर हिरोशी योशिदा यांच्या गणनेनुसार, येणाऱ्या काळात जपानमधील सगळ्या लोकांचं सरनेम सॅटो असेल. 2023 मध्ये जपानच्या 1.529 टक्के लोकसंख्येचं सरनेम सॅटो होणार आहे. हे या देशातील सगळ्यात कॉमन सरनेम आहे.

रिपोर्टनुसार, जपानमध्ये सॅटो सरनेमची वार्षिक ग्रोथ रेट 1.0083 टक्के आहे. अशात 2446 पर्यंत अर्ध्या लोकसंख्येचं सरनेम सॅटो होईल. यामागे जपानचा कायदाही आहे. ज्यानुसारही विवाहित जोडप्यांना एकच सरनेम ठेवायचं असतं. पण जपानमधील अनेक लोक याचा विरोधही करतात.

Web Title: A country where everyone's surname will become the same after 500 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.