एक असा देश जिथे आजपर्यंत एकही बाळ आलं नाही जन्माला, कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:12 PM2024-03-16T13:12:01+5:302024-03-16T13:13:13+5:30
आज या देशाला 95 वर्ष झाले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या देशात आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेलं नाही.
जगभरात असे अनेक देश आहेत जिथे आपल्या अनोखेपणांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे नियम आणि वेगवेगळ्या संस्कृती आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबाबत सांगणार आहोत. आम्ही आज जगातील सगळ्यात छोटा देश व्हॅटिकन सिटीबाबत सांगणार आहोत. या देशाची स्थापना 11 फेब्रुवारी 1929 रोजी करण्यात आली होती. आज या देशाला 95 वर्ष झाले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या देशात आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेलं नाही. आज याचंच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रोमन कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे सगळे मोठे धर्मगुरू इथेच राहतात. येथील शासक पोप आहे. जेव्हा हा देश तयार करण्यात आला होता तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होती की, हा देश केवळ रोमन कॅथलिक ख्रिश्चन लोकांसाठी काम करेल. म्हणजे जगात जेवढे कॅथलिक चर्च आहेत आणि कॅथलिक लोक आहेत. त्या सगळ्यांना इथूनच आदेश मिळतात.
या देशाची महत्वाची बाब म्हणजे या देशात एकही हॉस्पिटल नाही. याची अनेकदा चर्चाही झाली. याची मागणीही करण्यात आली, पण ती फेटाळण्यात आली. इथे जर कुणी गंभीर आजारी असेल किंवा एखादी महिला प्रेग्नेंट होते तेव्हा त्यांना रोमच्या हॉस्पिटमध्ये पाठवलं किंवा त्यासंबंधी एखाद्या दुसऱ्या देशात पाठवलं जातं.
हॉस्पिटल नसण्याचं कारण...
काही रिपोर्ट्सनुसार, व्हॅटिकन सिटीमध्ये हॉस्पिटल न उघडण्याचा निर्णय संभवतः याच्या छोट्या आकारामुळे आणि आजूबाजूच्या भागात चांगल्या चिकित्सा सुविधा असल्याकारणाने घेण्यात आला. व्हॅटिकन सिटीचा आकार केवळ 118 एकर आहे. इथे एकही हॉस्पिटल नाही. रग्णांना आणि महिलांना रोममधील हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं. व्हॅटिकन सिटीमध्ये प्रसूती गृहही नाहीये. त्यामुळे इथे एकाही बाळाचा जन्म होत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, इथे कधीही नॅचरल बेबी डिलिव्हरी झाली नाही. कारण जेव्हाही इथे एखादी महिला गर्भवती होते आणि तिची डिलिव्हरीची डेट जेवळ येते तेव्हा तिला येथील नियमांनुसार इथून बाहेर जावं लागतं. डिलिव्हरी झाल्यावर ती परत येऊ शकते. या नियमाचं पालन सगळेच करतात. हेच कारण आहे की, गेल्या 95 वर्षात इथे एकही बाळ जन्माला आलेलं नाही. एक कारण हेही आहे की, व्हॅटिकन सिटीमध्ये कधीही कुणाला स्थायी नागरिकत्व मिळत नाही. जितके लोक इथे राहतात ते त्यांच्या ठरलेल्या कार्यकाळापर्यंतच इथे राहू शकतात. त्यासाठी अस्थायी नागरिकता मिळते.