गांजा फुका अन् घ्या ८८ लाख पगार; 'या' कंपनीची अजब JOB ऑफर, नोकरीसाठी रांग लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:31 PM2023-02-13T14:31:41+5:302023-02-13T14:32:18+5:30

विशेष म्हणजे अनेक मुलांनी या विचित्र नोकरीच्या ऑफरसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

A German company has offer a position for a "cannabis sommelier a salary up to £88,000 | गांजा फुका अन् घ्या ८८ लाख पगार; 'या' कंपनीची अजब JOB ऑफर, नोकरीसाठी रांग लागली

गांजा फुका अन् घ्या ८८ लाख पगार; 'या' कंपनीची अजब JOB ऑफर, नोकरीसाठी रांग लागली

googlenewsNext

सध्याच्या काळात बेरोजगारी इतकी वाढलीय की नोकरी लोकांची गरज बनली आहे. घर खर्च भागवण्यासाठी लोक काहीही काम करण्यास तयार होत आहेत. जगात असे अनेक लोक आहेत जे सर्वकाही माहिती असूनही अजब गजब नोकरी करण्यास तयार असतात. त्यातील काहींबद्दल ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. अशाच एका अजब कंपनीच्या गजब जॉब ऑफरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

एक कंपनी अशा कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे, जे 'स्मोकर' आहेत. आता तुम्ही विचार कराल की ही कोणती कंपनी आहे ज्याला अशा लोकांची गरज होती. तर एका जर्मन कंपनीने 'Cannabis Sommelier' या पदासाठी जाहिरात जारी केली आहे. या अंतर्गत त्यांना 'प्रोफेशनल स्मोकर'ची गरज आहे. इतकंच नाही तर कंपनीने यासाठी एवढा पगार देऊ केला आहे की तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. या नोकरीसाठी निवडलेल्या कर्मचार्‍यांना कंपनी ८८ हजार पौंड (सुमारे ८८ लाख रुपये) पगार देऊ करत आहे.

कंपनीला हवाय वीड एक्सपर्ट
कंपनीचा दावा आहे की ती आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी 'वीड एक्स्पर्ट'(Weed Expert) शोधत आहे. कोलोन-आधारित कॅनामेडिकल जर्मन फार्मसीमध्ये औषधी कॅनबिस (भांग किंवा गांजा) विकते. यासाठी, ते त्याच्या उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी वास घेऊ शकतील, अनुभवू शकतील आणि धुम्रपान करू शकतील अशा लोकांचा शोध घेत आहे.

याबाबत सीईओ डेव्हिड हेन यांनी सांगितले की ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल, मॅसेडोनिया आणि डेन्मार्क सारख्या देशांसाठी आमच्या उत्पादनांच्या मानकांचे सतत निरीक्षण करू शकेल अशा व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत. कर्मचार्‍याला जर्मनीमध्ये वितरित केलेल्या सामग्रीची गुणवत्ता देखील तपासावी लागेल. विशेष म्हणजे अनेक मुलांनी या विचित्र नोकरीच्या ऑफरसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे भाग्यवान कर्मचाऱ्याला गांजाचा रुग्ण असणे आवश्यक आहे आणि जर्मनीमध्ये कायदेशीररित्या गांजाचे सेवन करण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी 'मनोरंजक वापर' गांजाच्या कायदेशीरीकरणाच्या प्रस्ताव आणला होता त्यावर खूप चर्चा झाली. कार्ल लॉटरबॅकनं ३० ग्रॅम पर्यंत गांजा बाळगणे आणि प्रौढांना या पदार्थाची विक्री करण्यास परवानगी देण्याचे प्रस्ताव उघड केले आहेत.

Web Title: A German company has offer a position for a "cannabis sommelier a salary up to £88,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.