अंतराळात आढळली रहस्यमय वस्तू, दर 20 मिनिटांनी पृथ्वीवर पाठवत आहे रेडिओ सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:24 PM2022-01-27T15:24:30+5:302022-01-27T15:24:56+5:30

शास्त्रज्ञांना दर 20 मिनिटांनी असे सिग्नल मिळत आहेत. असे रेडिओ सिग्नल यापूर्वी कधीही पाहिले किंवा जाणवले नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

A mysterious object found in space, sending radio signals to Earth every 20 minutes | अंतराळात आढळली रहस्यमय वस्तू, दर 20 मिनिटांनी पृथ्वीवर पाठवत आहे रेडिओ सिग्नल

अंतराळात आढळली रहस्यमय वस्तू, दर 20 मिनिटांनी पृथ्वीवर पाठवत आहे रेडिओ सिग्नल

googlenewsNext

सिडनी: अंतराळात बऱ्याच रहस्यमयी गोष्टी आहेत, यावर अनेक वर्षांपासून विविध देशातील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. पण, याच अंतराळातील हालचालींवर नजर ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांना धक्का बसला, जेव्हा त्यांना अंतराळातून शक्तिशाली रेडिओ सिग्नल पृथ्वीवर येत असल्याचे जाणवले.  मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून 4000 प्रकाशवर्षाच्या अंतरावर अंतराळात असलेल्या एका रहस्यमय वस्तूतून हे सिग्नल येत आहेत. शास्त्रज्ञांना दर 20 मिनिटांनी असे सिग्नल मिळत आहेत. असे रेडिओ सिग्नल यापूर्वी कधीही पाहिले किंवा जाणवले नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे सिग्नल नेमके कुठून येत आहेत आणि त्यामुळे काय परिणाम होईल, हे सांगणे अद्याप कठीण आहे.

चुंबकीय क्षेत्र खूप शक्तिशाली

'डेली मेल'च्या बातमीनुसार, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सिग्नल ज्या ठिकाणातून येत आहेत, तो हा न्यूट्रॉन तारा किंवा पांढर्‍या ताऱ्याचे अवशेष असू शकतो. एकतर याचे चुंबकीय क्षेत्र खूप मजबूत आहे किंवा हा तारा नसून, काहीतरी नवीनच वस्तू आहे. ही वस्तू मार्च 2018 मध्ये पहिल्यांदा दिसली होती. 

लाईट हाऊससारखे असतात सिग्लन

अहवालात असे म्हटले आहे की, ही वस्तू जेव्हा रेडिओ सिग्नल उत्सर्जित करते, तेव्हा ते सिग्लन सहजपणे दिसत आहेत. हे एक प्रकारच्या आकाशीय लाइट हाऊससारखे आहे. शास्त्रज्ञांच्या तपासणीत हे देखील समोर आले आहे की, ही वस्तू लहरींसोबत मोठ्या प्रमाणात ऊर्जा सोडत आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ. नताशा हर्ले वॉकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने या अत्यंत रहस्यमय वस्तूचा शोध लावला आहे.

अशाप्रकारे लागला शोध

नताशाची टीम अंतराळात असलेल्या रेडिओ लहरींचा नकाशा बनवत होती, त्यादरम्यान त्यांना या रहस्यमय वस्तूबद्दल माहिती मिळाली. याबाबत त्या म्हणाल्या, 'आमच्या निगराणीदरम्यान ही वस्तू कधीतरी दिसते आणि नंतर गायब होते, हे पूर्णपणे अनपेक्षित आहे. ही संपूर्ण घटना एका अर्थाने अतिशय भीतीदायक आहे, कारण ती अंतराळात यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती. 

Web Title: A mysterious object found in space, sending radio signals to Earth every 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.