व्यक्तीला जमिनीत खोदकाम करताना सापडला हिरा, पण कहाणीत आहे ट्विस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 04:16 PM2024-04-11T16:16:20+5:302024-04-11T16:17:06+5:30

नुकताच असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे.

A person found a diamond while digging in the ground, but there is a twist in the story! | व्यक्तीला जमिनीत खोदकाम करताना सापडला हिरा, पण कहाणीत आहे ट्विस्ट!

व्यक्तीला जमिनीत खोदकाम करताना सापडला हिरा, पण कहाणीत आहे ट्विस्ट!

पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जमिनीखाली दडलेल्या आहेत. जसे की खनिज. खनिज जमीन खोदूनच बाहेर काढले जातात. हिराही असाच रत्न आहे जो जमीन खोदून काढला जातो. हे रत्न जमिनीखालीच तयार होतात. जर कुणाला हिरा सापडला तर ती व्यक्ती रातोरात श्रीमंत बनू शकते. एका व्यक्तीसोबतही असंच झालं. ही व्यक्ती जमिनीत खोदकाम करत होती तेव्हाच त्याला एक हिरा सापडला. पण त्यात एक ट्विस्ट आहे.

इंस्टाग्रामवर @_.archaeologist वर असेच अवाक् करणारे अनोखे व्हिडीओ शेअर केले जातात. नुकताच असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे. हिऱ्यांचं खनन फार खोल खाणींमध्ये केलं जातं. त्यामुळे सगळ्यात आधी तर या व्हिडीओवर अनेकांचा विश्वास बसणार नाही.

 

व्यक्ती व्हिडीओत जमीन खोदताना दिसत आहे. तिथे त्याला एक अडकलेला हिरा दिसतो. तो जसा हिरा बाहेर काढतो तेव्हा त्याला समजतं की, हा हिरा पॉलिश करण्यात आलेला आहे. हिरे खाणीतून काढल्यानंतर ते पॉलिश केले जातात. त्यांना कट करून शेप दिला जातो. तेव्हा कुठे तो चमकदार बनतो. पण व्हिडीओ पाहून हे स्पष्टपणे दिसतं की, व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने हिरा व्हिडीओ बनवण्याआधी मुद्दाम जमिनीत पुरला होता. हेही सांगता येणार नाही की, हिरा खरा आहे की खोटा. आजकाल असे खोटे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

Web Title: A person found a diamond while digging in the ground, but there is a twist in the story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.