'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 01:05 AM2024-11-26T01:05:22+5:302024-11-26T01:06:59+5:30
का 30 वर्षीय तरुणीची जाहिरात सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. तिने तिच्या आदर्श पतीसाठी अशा अटी नमूद केल्या आहेत की, वाचकही आश्चर्यचकित झाले आहेत...
आजकाल ऑनलाइन डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर लग्नाच्याजाहिरातींचा ट्रेंड सुरू आहे. यातच, सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचीजाहिरात जबरदस्त व्हायरल होत आहे. एक 30 वर्षीय तरुणी आदर्श पतीच्या शोधात असते. महत्वाचे म्हणजे, मुलगा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक असावा, त्याच्याकडे किमान 20 एकरात फार्महाऊस असावे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तो पादणारा अथा ढेकर देणारा नसावा, अशा अटी संबंधित तरुणीने जाहिरातीत नमूद केल्या आहेत. सोशल मीडियावर या जाहिरातीसंदर्भात लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.
एका 30 वर्षीय तरुणीची जाहिरात सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. तिने तिच्या आदर्श पतीसाठी अशा अटी नमूद केल्या आहेत की, वाचकही आश्चर्यचकित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, तरुणीला न पादणारा आणि ढेकर न देणारा वर हवा आहे. या अजब जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अशा आहेत तरुणीच्या अपेक्षा -
संबंधित 30 वर्षीय तरुणी एका देखण्या वराच्या शोधात आहे. ज्यांचे वय 25 ते 28 वर्षांदरम्यान असावे. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असावा. त्याचा एक चांगला आणि मजबूत व्यवसाय असावा. वराकडे किमान एक बंगला अथवा 20 एकरात फार्महाऊस असावे. वरास स्वयंपाकही यायला हवा.
30-year-old feminist woman, working against capitalism requires a 25-year-old wealthy boy with a well-established business.
— Rishi Bagree (@rishibagree) November 24, 2024
Koi Ho tou batana 😀 pic.twitter.com/7YVPnmMMfT
या पोस्टला आतापर्यंत 3,000 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर 800 हून अधिक वेळा शेअर करण्यात आली आहे.